शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली
2
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
3
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
4
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
5
भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती
6
IND vs UAE: अभिषेक शर्माची रेकॉर्ड बूकमध्ये नोंद, 'अशी' कामगिरी करणारा चौथा भारतीय
7
हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
8
मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्
9
दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?
10
लॅरी एलिसन यांनी मस्क यांना टाकलं मागे! बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; काय करतात व्यवसाय?
11
कोण आहेत अबिदुर चौधरी? ज्यांनी डिझाईन केला Apple चा सर्वात स्लीम iPhone 17 Air
12
नेपाळचे नवे सत्ताधीश कोण? जेन झी ठरविणार, सुशीला कार्की, बालेंद्र शाह, कुलमान घिसिंग चर्चेत
13
"२.४६ कोटी घ्यायचेत"; बँकेच्या बाथरुममध्ये बिझनेसमनने स्वत:वर झाडल्या गोळ्या, कारण...
14
मानेत गोळी लागताच रक्ताची धार अन्...; चार्ली कर्कच्या हत्येचा VIDEO समोर, १८० मीटरवर होता शूटर
15
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
16
आम्ही नेपाळमध्ये सुरक्षित; कुठलीही गैरसोय नाही; ठाणे जिल्ह्यातील पर्यटकांनी सांगितली परिस्थिती
17
पेट्रोल-डिझेल जीएसटी अंतर्गत येऊ शकतात का? सीबीआयसी अध्यक्षांनी सांगितली आतली बातमी
18
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
19
सर्वसामान्यांमध्ये मोठी क्रेझ असणाऱ्या 'Hero Passion+' दुचाकीची GST कपातीनंतर नवीन किंमत काय?
20
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला

सिद्धेश्वर तलावाचा परिसर तीन दिवस उजळणार; सरसावले सर्वच जाती-धर्मातील सोलापूरकर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 11:02 IST

‘लोकमत’ भवनमध्ये नियोजन बैठक : विविध शाळा, महिला संघटनांनाही सामावून घेणार; तलावाकाठी जीवरक्षक ठेवण्याचाही निर्णय

ठळक मुद्देनऊ-साडेनऊशे वर्षांची परंपरा असलेल्या श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेकडे समतेची यात्रा आजवर शहर आणि परिसरावर कुठलीच नैसर्गिक विघ्नं आली नाहीत ग्रामदैवत हे विविध जाती-धर्मांमधील भक्तगणांचे श्रद्धास्थान

सोलापूर : ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या मंदिरासह सोलापूरचे ब्रॅण्डिंग करण्यासाठी यंदा ‘लोकमत’च्या पुढाकारातून १० ते १२ जानेवारी असे तीन दिवस मंदिर परिसर अन् तलावात लक्ष दीपोत्सव साजरा करण्याचा निर्णय सोमवारी सकाळी ‘लोकमत’ भवनमध्ये आयोजित पहिल्याच नियोजन बैठकीत घेताना विविध जाती-धर्माच्या सहा संघटनांच्या प्रमुखांनी एकमुखी पाठिंबा तर दिलाच, शिवाय ‘ग्रामदैवताची यात्रा नव्हे तर महाउत्सव’ असा जणू निर्धारच केला. लक्ष दीपोत्सवात शाळा-महाविद्यालये अन् महिला मंडळांनाही सहभागी करुन घेतले जाणार आहे. 

नऊ-साडेनऊशे वर्षांची परंपरा असलेल्या श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेकडे समतेची यात्रा म्हणून पाहिली जाते. आजवर शहर आणि परिसरावर कुठलीच नैसर्गिक विघ्नं आली नाहीत, ही सिद्धरामांचीच कृपा अथवा महिमा म्हणावा लागेल. म्हणूनच ग्रामदैवत हे विविध जाती-धर्मांमधील भक्तगणांचे श्रद्धास्थान आहे. समतेच्या यात्रेत सर्वच जाती-घटकांना सामावून घेऊन लक्ष दीपोत्सव साजरा करण्याची संकल्पना मांडत ‘लोकमत’ने याबाबत पुढाकार घेतला. लक्ष दीपोत्सवाबाबत सहा प्रमुख संघटनांची नेमकी भूमिका अन् त्यांच्या सूचना जाणून घेण्यासाठी नियोजन बैठकीचे आयोजन केले होते. 

बैठकीला सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार, वीरशैव व्हिजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले, चिदानंद मुस्तारे, विजापूर वेस युवक संघटनेचे अध्यक्ष अशपाक बागवान, समस्त ब्राह्मण समाज संघटनेचे मधुकर कुलकर्णी, जी. एम. ग्रुपचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे, हिंदू धनगर सेनेचे अध्यक्ष अमोल कारंडे, मार्कंडेय जनजागृती संघाचे जिल्हा सचिव श्रीनिवास रच्चा, शहराध्यक्ष किशोर व्यंकटगिरी, जिल्हा कार्याध्यक्ष नितीन मार्गम, माहेश्वरी प्रगती मंडळाचे प्रवीण भुतडा यांची उपस्थिती होती. तीन दिवस चालणाºया या दीपोत्सवात प्रत्येक दिवशी एकेका घटकांना सामावून घेतले जाईल.

तलावानजीक असलेल्या पायºयांवर मातीच्या पणत्या तर तलावात पर्यावरणपूरक तरंगणाºया पणत्या सोडण्यात येतील. दिव्यांसाठी तेल, तुपाचा वापर करण्यात येणार असून, महिला मंडळांकडून वाती तयार करुन घेण्याचे काम करुन घेता येईल का ? यावरही चर्चा झाली. यापुढे होणाºया बैठकीत दीपोत्सवाचे निश्चित नियोजन होण्यावर शिक्कामोर्तब करु या. बारीक-सारीक गोष्टींचाही विचार करुन दीपोत्सवाचा सोहळा कसा यशस्वी करता येईल, यावरही प्रत्येकाने आपले मत मांडले. तमाम सोलापूरकरांनी दीपोत्सव-२०२० मध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन बैठकीत करण्यात आले. 

स्थळ अन् वेळही निश्चित - मंदिर परिसरातील तलावाचा काठ, विष्णू अन् गणपती घाट हे दीपोत्सवासाठी निश्चित करण्यात आले असून, अजून कुठे करण्यासारखे वाटले तर तेथेही हा नयनरम्य सोहळा साजरा करण्यात येणार आहे. सायंकाळी ६ वाजता दीपोत्सवास प्रारंभ होईल. तत्पूर्वी सायंकाळी ५ वाजताच विविध संघटनांचे पदाधिकारी, शालेय विद्यार्थी त्याचे नियोजन करतील. ध्वनिक्षेपकावरुन संदेश येताच अथवा शिट्टी मारताच एकाच वेळी सर्वच दिवे प्रज्वलित होतील.

विविध समित्या स्थापण्याचा निर्णय- ऐन यात्रेत श्री सिद्धरामेश्वर मंदिरात भक्तगणांची मोठी गर्दी असते. या गर्दीचा विचार करुन दीपोत्सवात कसलेच अडथळे येऊ नये यासाठी विविध समित्या स्थापन करण्यावरही एकमत झाले. पणत्या आणण्यापासून ते वाती तयार करण्यापर्यंत, पोलिसांचा बंदोबस्त लावण्यापासून ते पार्किंगची सोय करण्यापर्यंत, सोहळ्यातील भाविकांना शिस्त लावण्यापासून ते तलावाच्या काठावर जीवरक्षक ठेवण्यापर्यंतची जबाबदारी निश्चित करण्यासाठी या समित्या चोखपणे आपले काम पार पाडतील, असा विश्वासही संघटनांच्या पदाधिकाºयांनी व्यक्त केला.

लक्ष्मी मंडईसमोरील महाद्वार उजळवू- बागवान- श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीने लक्ष्मी मंडईसमोर आकर्षक असे महाद्वार उभे केले आहे. सोलापूरच्या सौंदर्यात भर घालणाºया या महाद्वारावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्याचा संकल्प विजापूर वेस युवक संघटनेचे अध्यक्ष अशपाक बागवान यांनी बैठकीत सोडला. लक्ष दीपोत्सवात मुस्लीम समाजातील महिलांसह बांधव हिरीरीने सहभागी होतील, असा विश्वासही बागवान यांनी व्यक्त केला. खºया अर्थाने ही यात्रा समतेची यात्रा करुन दाखवू, असा निर्धारही त्यांनी सोडला. सोलापुरातील मुस्लीम समाज बांधवांच्या संघटनांनाही उपक्रमात एकत्र आणण्याचाही प्रयत्न करणार असल्याचे सांगत दीपोत्सवाच्या माध्यमातून शहरात राष्ट्रीय एकात्मतेचेही दर्शन घडणार असल्याचे त्यांनी नमूद केले. 

देवस्थान पंचकमिटी कुठे तरी मागे पडते- माऊली पवार- गेल्यावर्षी वीरशैव व्हिजनच्या माध्यमातून ‘लोकमत’ने प्रकाशमय यात्रेची संकल्पना यशस्वी केली. मंदिरासह सोलापूरचे ब्रॅण्डिंग होण्यासाठी ‘लोकमत’ची तळमळ वाखाणण्याजोगी आहे. यंदा लक्ष दीपोत्सव ही संकल्पनाही यात्रेला चारचाँद लावणारी आहे. ‘लोकमत’च्या प्रत्येक उपक्रमात विविध संघटना, व्यापारी सहभागी होताना श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटी मागे पडता कामा नये. मंदिर परिसराच्या स्वच्छतेकडे कमिटीचे दुर्लक्ष आहे. मंदिर समिती कुठे तरी कमी पडते. जोपर्यंत मंदिराचा विकास होत नाही, तोपर्यंत शहराचा विकास होणार नसल्याचे स्पष्ट मत सकल मराठा समाजाचे समन्यवक माऊली पवार यांनी मांडताना लक्ष दीपोत्सवात सकल मराठा समाजाचे मोठे योगदान राहणार असल्याची ग्वाही दिली. 

गेल्या वर्षी ‘लोकमत’च्या पुढाकारातून प्रकाशमय यात्रेची संकल्पना हाती घेतली. सर्वच जाती-धर्मांमधील घटकांनी मोठे योगदान दिल्यामुळेच प्रकाशमय यात्रा यशस्वी झाली. केवळ सिद्धरामेश्वर मंदिर आणि सोलापूरचे ब्रॅडिंग करण्याचा हा उद्देश होता. यंदा ‘लोकमत’ने लक्ष दीपोत्सवचा संकल्प सोडला आहे. हा संकल्प करताना ‘लोकमत’ने विविध जाती-धर्मांमधील संघटनांना सहभागी करुन घेतले आहे. त्यामुळे लक्ष दीपोत्सव हाही उपक्रम यशस्वी होईल, अशी खात्री वाटते.-राजशेखर बुरकुले,संस्थापक- वीरशैव व्हिजन. 

पूर्वी सोलापूर फेस्टिव्हल साजरा व्हायचा. शहरात आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमांना फंड मिळत असतो. जिल्हाधिकाºयांशी संपर्क साधून दीपोत्सवासाठी फंड मिळतो का ते पाहावे. दीपोत्सवासाठी जो काही खर्च येणार आहे, त्यापैकी काही रक्कम माहेश्वरी प्रगती मंडळातर्फे देण्याचा मी प्रयत्न करेन. मारवाडी समाजाच्या दमाणी आणि महेश इंग्लिश मीडियम स्कूल या दोन शाळा आहेत. या दोन शाळा दीपोत्सवात सहभागी होतील.-प्रवीण भुतडा,अध्यक्ष- माहेश्वरी प्रगती मंडळ.

‘लोकमत’च्या पुढाकारातून सिद्धरामेश्वरांच्या यात्रेतील लक्ष दीपोत्सव सोहळा म्हणजे मंदिराबरोबर सोलापूरचे ब्रॅण्डिंग होणार आहे. काम कठीण असले तरी सर्वांच्या योगदानामुळे ते सहजशक्य होणार आहे. सकल ब्राह्मण समाज संघातर्फे १० किलो तूप दीपोत्सवासाठी देण्याचे मी आताच जाहीर करतो. शिवाय निराळे वस्तीतील काही महिलांकडून वाती तयार करुन घेण्याचे काम होते का ? याचाही विचार करतो. -मधुकर कुलकर्णी,राष्ट्रीय अध्यक्ष- पौरोहित्य कल्याणकारी संस्था व सकल ब्राह्मण समाज.

आज शिर्डी संस्थान, बालाजी देवस्थानसह इतर देवस्थानची कीर्ती सातासमुद्रापार पोहोचली. इतर जिल्हा आणि परप्रांतातील मंडळी सोलापूरला येतात. मात्र मंदिरात येत नाहीत. मंदिराची कीर्ती सर्वदूर पोहोचवण्यासाठी आणि सोलापूरचे ब्रॅण्डिंग करण्यासाठी ‘लोकमत’ने दीपोत्सवाच्या माध्यमातून उचललेले हे स्वागतार्ह पाऊल आहे. दीपोत्सवासाठी जे-जे काही करता येईल, ते श्री मार्कंडेय जनजागृती संघाच्या माध्यमातून करु. -श्रीनिवास रच्चा,जिल्हा सचिव- श्री मार्कंडेय जनजागृती संघ.

पूर्व भागातील प्रत्येक उत्सवात दीपोत्सव साजरा केला जातो. मार्कंडेय जनजागृती संघाच्या वतीनेही दरवर्षी दीपोत्सव साजरा केला जातो. मात्र आता ‘लोकमत’च्या माध्यमातून आम्हाला तो अधिक मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याची संधी यात्रेच्या निमित्ताने आली आहे. दीपोत्सव साजरा करताना येणाºया अडचणी सोडविण्याबरोबरच जी काही मदत लागेल, ती मदत देण्यासाठी संघ निश्चितपणे पुढे आल्याशिवाय राहणार नाही.-किशोर व्यंकटगिरी,शहराध्यक्ष- श्री मार्कंडेय जनजागृती संघ.

 ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेनिमित्त दीपोत्सव साजरा करण्याचा पुढाकार ‘लोकमत’ने घेतला आहे. या उपक्रमात सहभागी होण्याची संधी पूर्व भागातील तेलुगू भाषिकांना मिळाली, याचा विशेष आनंद आहे. लक्ष दीपोत्सव हा सोहळा यशस्वी होण्यासाठी सर्वच जाती-धर्मांतील लोकांना एकत्र येण्याची गरज आहे. एक शिस्तबद्ध अन् देखणा दीपोत्सव साजरा करुन ग्रामदैवताची यात्रा ‘न भूतो न भविष्यती’अशीच करुन दाखवू.-तिरुपती वग्गा, जिल्हा उपाध्यक्ष- श्री मार्कंडेय जनजागृती संघ.

‘लोकमत’ने हाती घेतलेली दीपोत्सवाची संकल्पना सोलापूरच्या ब्रॅण्डिंगला बळ देणारी आहे. ब्रॅण्डिंगमुळे इतर शहरे पुढे गेली. या बाबतीत सोलापूर खूपच मागे राहिले आहे. गेल्या वर्षी ‘लोकमत’ने प्रकाशमय यात्रेची संकल्पना मांडून ब्रॅण्डिंगला सुरुवात केली. माझी खरेदी सोलापुरातच हा उपक्रमही यशस्वी करुन दाखवला. यंदा दीपोत्सव हा अनोखा सोहळा यशस्वी करू या. -चिदानंद मुस्तारे, वीरशैव व्हिजन

‘लोकमत’ने हाती घेतलेली दीपोत्सवामुळे यंदाची यात्रा उजळून निघणार आहे. या उपक्रमात सोलापुरातील प्रत्येक जण सहभागी व्हावा. ज्या ग्रामदैवतामुळे आपण सुखी आहोत, त्या ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या मंदिराचे प्रचार, प्रसार व्हावा यासाठी दीपोत्सव यशस्वी करण्याची प्रत्येकाची जबाबदारी आहे. आम्ही हा उपक्रम यशस्वी करणारच. -नितीन मार्गम, मार्कंडेय जनजागृती संघ

विविध जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदत असतात. ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांच्या कृपेने आजवर सोलापूरवर कुठलेच नैसर्गिक संकट आले नाही. त्यामुळे सिद्धरामेश्वरांच्या यात्रेत शहरातील प्रत्येक घटकामधील लोक सहभागी होतात. महात्मा बसवेश्वरांच्या समतेचा संदेशही यात्रेत दिसतो. म्हणूनच ही यात्रा प्रकाशमय करण्याबरोबर दीपोत्सवाचा उपक्रमही तडीस नेऊन सोलापूरचे ब्रॅण्डिंग करण्याची संधी आली आहे. -बाळासाहेब वाघमारे, संस्थापक- जी. एम. ग्रुप. 

जात-पात अन् धर्म विसरुन सोलापूरकर मंडळी ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेत सहभागी होतात. ‘ये तो सुवर्ण मंदिरसेही बेहतरीन है’ असे लालकृष्ण अडवाणी मागे सोलापूरच्या श्री सिद्धेश्वर मंदिरास भेट दिल्यावर बोलले होते. मंदिराचे ब्रॅण्डिंग झाले तर सोलापूरचे ब्रॅण्डिंग होण्यासारखे आहे. गेल्या वर्षी प्रकाशमय यात्रेच्या माध्यमातून ब्रॅण्डिंग करण्याचा प्रयत्न ‘लोकमत’ने केला. यंदाही त्यांचा दीपोत्सवाचा उपक्रम कौतुकास्पद आहे.  -अमोल कारंडे, अध्यक्ष- हिंदू धनगर सेना.   

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Siddheshwar Yatraसोलापूर सिद्धेश्वर यात्रा