शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus; अकरा दिवसांसाठी शटर डाऊन; अत्यावश्यक सेवा वगळता सोलापुरात सर्वच बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 10:53 IST

कोरोना इफेक्ट : ३१ मार्चपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता जिल्ह्यातील संपूर्ण बाजारपेठ बंद

ठळक मुद्देसर्व मॉल्स, आठवडा बाजार, जनावरांच्या बाजारावर बंदी घालण्यात आलीगर्दी होणारी ठिकाणे ३१ मार्चच्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेशआता ३१ मार्चपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद करण्याचा आदेश

सोलापूर : कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता ३१ मार्चपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद करण्याचा आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी शुक्रवारी सायंकाळी जारी केला आहे. अत्यावश्यक सेवेमध्ये भाजीपाला, किराणा दुकाने, मेडिकल, सरकारी कार्यालये, बँका, रेस्टॉरंट, खानावळ यांना सूट देण्यात आली आहे.  दरम्यान, सायंकाळी नवीपेठेसह सर्व प्रमुख दुकानांमध्ये महत्त्वाची खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी उसळली.  जणू दिवाळीसारखी भरपूर खरेदी करण्याचा सपाटाच अनेकांनी लावला.

महाराष्ट्र शासनाने राज्यात कोरोना विषाणूमुळे उद्भवणाºया संसर्गजन्य आजारामुळे आरोग्यविषयक आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्याने जागतिक आरोग्य संघटना, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने साथीच्या नियंत्रणाबाबत प्रसारित केलेल्या विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. 

कोरोनाच्या संसर्गावर नियंत्रण आणणे व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यापूर्वीच सर्व मॉल्स, आठवडा बाजार, जनावरांच्या बाजारावर बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर नागरिकांच्या गर्दीमुळे होणारे संभाव्य धोके लक्षात घेता शुक्रवारी दागिने, कापड दुकाने, आॅटोमोबाईल क्षेत्रातील वाहन खरेदी-विक्री, भांड्यांची दुकाने, इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक्स साहित्य विक्रीची दुकाने, टिंबर, प्लायवूड व इतर दुकाने बंद करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.  कोरोना विषाणूची संक्रमण अवस्था पाहता संपर्काचा व्यापक परिणाम असल्याने जिल्ह्यातील सर्वप्रकारची दुकाने, सेवा आस्थापना, उपाहार व खाद्यगृहे, खानावळ, क्लब, पब, व्हिडिओ पार्लर, आॅनलाईन सेंटर अशी गर्दी होणारी ठिकाणे ३१ मार्चच्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले. 

हे राहतील बंद

  • - सर्व प्रकारचे मॉल्स
  • - दागिन्यांची दुकाने
  • - कापडाची दुकाने
  • - भांडी, साहित्याची दुकाने
  • - आॅटोमोबाईल दुकाने
  • - इलेक्ट्रिक वस्तू
  • - इलेक्ट्रॉनिक वस्तू
  • - टिंबर, प्लायवूडची दुकाने

यांना आहे परवानगी

  • - सर्व शासकीय कार्यालये
  • - दवाखाने, लॅब व कर्मचारी
  • - रेल्वे, एसटी, रिक्षा, बससेवा
  • - अंत्ययात्रा व अंत्यविधीचे ठिकाण
  • - किराणा, दूध, भाजी विक्री केंद्र
  • - मेडिकल, रक्तपेढी
  • - पेट्रोलपंप, रेशन दुकान
  • - लॉजचे रेस्टॉरंट
  • - वसतिगृह विद्यार्थी खानावळ
  • - परीक्षा केंद्र व पर्यवेक्षकांचे काम
  • - प्रसारमाध्यमांची कार्यालये
  • - निर्मिती करणाºया कंपन्या
  • - बँका व मोबाईल सेवा
टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यMedicalवैद्यकीयhospitalहॉस्पिटल