शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

ग्रामीण भागातील दुकाने आता रात्री दहापर्यंत; उद्यापासून मंदिरे आणि प्रार्थना स्थळे उघडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2021 10:52 IST

जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश :

सोलापूर : माळशिरस, करमाळा, सांगोला, पंढरपूर तसेच माढ्यासह जिल्ह्यातील इतर तालुक्यातील व्यापारी दुकाने गुरुवार, ७ ऑक्टोबरपासून रात्री दहापर्यंत सुरू राहतील. यासोबत कोविड प्रतिबंधक उपाययोजनांची अंमलबजावणी करून जिल्ह्यातील सर्व मंदिरे आणि प्रार्थना स्थळेही सुरू राहतील. रोज किती भक्त दर्शन घेतील, याबाबत मंदिर समितीने निर्णय घ्यावा, असे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी मंगळवारी दिले आहेत.

वाढत्या कोविड रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर, माळशिरस, करमाळा, सांगोला तसेच माढा तालुक्यात दुपार चारपर्यंत जमावबंदी तसेच सायंकाळी पाच नंतर संचारबंदी होती. ही संचारबंदी गुरुवारपासून उठवण्यात आली असून, आता जिल्ह्यातील सर्व दुकाने, मॉल्स रात्री दहापर्यंत सुरू राहतील, असे आदेशात म्हटले आहे.

दुकानांबरोबरच हॉटेल्स, रेस्टॉरंट सुरू राहतील. एकूण क्षमतेच्या ५० टक्क्यांची सवलत दिली आहे. पन्नास टक्के क्षमतेने सलून, क्रीडांगणे व व्यायामशाळांना सूट दिली आहे. मंगल कार्यालये व सभागृहे ५० टक्केच्या क्षमतेने सुरू राहतील. बंदिस्त सभागृहातील लग्न समारंभाला १०० जणांना तसेच खुल्या लॉनमधील विवाह सोहळ्यास दोनशे जणांना उपस्थित राहता येईल. नवीन आदेशामुळे ग्रामीण भागातील व्यापारी व दुकानदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. सिनेमागृहे आणि थिएटर्संना अद्याप सुट देण्यात आलेली नाही. मॉल्स रात्री दहापर्यंत सुरू राहतील. अठरा वर्षातील मुलांना मॉलमध्ये जाताना वयाचा दाखला किंवा आधारकार्ड सोबत बाळगणे बंधनकारक करण्यात आला आहे.

ज्या नागरिकांचे लसीकरण झालेले आहे, अशा परराज्यातील प्रवाशांना सोलापुरात येताना आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक नसेल; परंतु ७२ तासापूर्वीची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह किंवा १४ दिवस विलगीकरण आवश्यक राहील, असे आदेशात म्हटले आहे.

 

मंदिरांसाठी नियमावली

  • सैनिटायझर, मास्क आणि फिजिकल डिस्टन्सिंग बंधनकारक
  • प्रतिबंधित क्षेत्रातील मंदिरे बंद राहतील
  • मंदिरातील पुतळे, मूर्ती तसेच पवित्र ग्रंथास स्पर्श करू नका
  • मंदिर परिसरात मेळावे, संमेलनांना बंदी
  • प्रसाद तसेच तीर्थ वाटपाला बंदी
  • तीर्थही शिंपडता येणार नाही
  • भक्तीगीते वगळता समूहगीते गाण्यास बंदी
  • आजारी व्यक्तींसाठी स्वतंत्र खोलीची व्यवस्था असावी
  • पादत्राणे स्वत:च्या वाहनात ठेवा
  • एकाच चटईवर एकाने प्रार्थना करावी
टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयcorona virusकोरोना वायरस बातम्या