शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक; पंढरपुरात पॉझिटिव्ह रुग्णाचा उपचाराविना तडफडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 13:16 IST

नातेवाईकांचा हॉस्पिटलवर आरोप; अहवालासाठी उपचारास दिला नकार

ठळक मुद्देपंढरपुरातील इंदिरा गांधी भाजी मार्केटमधील एका चहा विक्रेत्यास बुधवारी सकाळी फणफणून ताप आलात्याच्या नातेवाईकांनी आरोग्य विभागामार्फत सुरू असलेल्या रॅपिड अँटिजेन किटद्वारे तपासणी मोहिमेच्या ठिकाणी त्यांना नेले

सोलापूर : पंढरपुरात पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या एका चहावाल्याचा हॉस्पिटलच्या दारात तडफडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली आहे. अँटिजेन टेस्टमध्ये तो  पॉझिटिव्ह आल्याने नातेवाईकांनी कोविड हॉस्पिटलमध्ये उपचारास नेले असता संबंधित डॉक्टरांनी अहवाल आल्याशिवाय उपचार करणार नाही, अशी भूमिका घेतल्याने हा प्रकार घडल्याचा आरोप संबंधिताच्या नातेवाईकांनी केला आहे. 

पंढरपुरातील इंदिरा गांधी भाजी मार्केटमधील एका चहा विक्रेत्यास बुधवारी सकाळी फणफणून ताप आला. त्यामुळे त्याच्या नातेवाईकांनी आरोग्य विभागामार्फत सुरू असलेल्या रॅपिड अँटिजेन किटद्वारे तपासणी मोहिमेच्या ठिकाणी त्यांना नेले. तपासणीत त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे तेथील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नातेवाईकांनी त्यांना उपचारासाठी प्रशासनाने सुरू केलेल्या कोविड हॉस्पिटलमध्ये त्यांना नेले. तेथील डॉक्टरास नातेवाईकांनी आमच्या घरातील व्यक्ती पॉझिटिव्ह आली आहे, त्यांना उपचारासाठी दाखल करून घ्या म्हणून आग्रह केला. पण तेथील डॉक्टरांनी आधी रिपोर्ट येऊ द्या, मग आम्ही उपचारास दाखल करून घेऊ, अशी भूमिका घेतली. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णास तसेच तिष्ठत ठेवण्यात आले.

यादरम्यान त्या चहा विक्रेत्याचा मृत्यू झाला. ते पॉझिटिव्ह आहेत, हे माहीत असूनही कोविड हॉस्पिटलने वेळेत उपचार न केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याबाबत संताप व्यक्त करीत नातेवाईकांनी त्यांचा मृतदेह मंडईतील घराकडे हलविला. 

मगच मृतदेहाला हात लावा...

  • - घडल्या प्रकाराची माहिती मिळताच मुख्याधिकारी व संबंधित आरोग्य अधिकाºयांनी मंडईत धाव घेतली. त्यावेळी संबंधित मृताच्या नातेवाईकांनी आधी त्या हॉस्पिटलवर कारवाई करा, मगच मृतदेहास हात लावा, अशी भूमिका घेतली. 
  • -  आरोग्य विभागावरचे टेन्शन वाढले. घटनास्थळी पोलिसांनाही पाचारण करण्यात आले असून, घडल्या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार यांनी या प्रकरणाची माहिती घेत असल्याचे सांगितले. 

पंढरपुरातील कथित घटनेबाबत मला आरोग्य यंत्रणेतील कोणीही अद्याप माहिती दिलेली नाही. सोशल मीडियावर आलेली पोस्ट मी पाहिली असून, याबाबत चौकशी सुरू केली आहे. - डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा  शल्यचिकित्सक 

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याPandharpurपंढरपूरDeathमृत्यू