शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक; बेपत्ता महिला बॉन्ड रायटरचा खून; कलेक्टर कचेरीत आढळला मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2022 13:26 IST

दोन दिवसांपासून नव्हता संपर्क: सदर बझार पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा

सोलापूर : बेपत्ता झालेल्या महिला बॉन्ड रायटरचा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील पडक्या खोलीमध्ये खून झाला. प्रथमदर्शनी महिलेच्या अंगावर जखमा असल्याचे आढळून आल्याचे नातेवाइकांकडून सांगण्यात येत आहे. सदर बझार पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रजिया सलीम शेख (वय ७२, रा.नवीन विडी घरकूल, सोलापूर) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. रजिया शेख या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बॉन्ड रायटर म्हणून काम करतात. दि.२५ जून रोजी शनिवार असल्याने जिल्हाधिकारी कार्यालय बंद होते. मात्र परिसरातील दर्ग्याला जाते, असे सांगून त्या घरातून निघून गेल्या. दर्ग्यात दर्शन घेऊन त्या स्वत: जिथे बॉन्ड रायटरचे काम करत होत्या त्या ठिकाणी गेल्या. मात्र त्यानंतर रजिया शेख अचानक गायब झाल्या. शनिवार व रविवार दोन दिवस त्या कोठे गेल्या हे समजले नाही. नातेवाईकांनी फोन केला असता तो स्विच ऑफ लागत होता.

सोमवारी सकाळी नेहमी प्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात नागरिक येण्यास सुरूवात झाली. पडक्या इमारतीच्या परिसरातून दुर्गधी येत होती. एका कार्यालयातील शिपाई आत गेला असता त्यांना रजिया शेख यांचे मृतदेह आढळून आला. शिपायाने पोलिसांना याची माहिती दिली. सदर बझार पोलीस ठाण्याचे कर्मचारी दाखल झाले. रजिया शेख यांच्या मुलीला फोन करून माहिती देण्यात आली, नातेवाईकही घटनास्थळी आले. पंचनामा करून मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले.

पोलीस अधिकाऱ्यांनी दिली भेट

  • ० संशयास्पद मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर पाेलीस उपायुक्त बापू बांगर, सहायक पोलीस आयुक्त डॉ. प्रीती टिपरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले, दुय्यम पोलीस निरिक्षक पोपटराव धायतोंडे आदी पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली.
  • ० रजिया शेख यांच्याजवळ मोबाईल होता, तो गेल्या दोन दिवसांपासून बंद असून तो मृतदेहाजवळ आढळून आला नाही.
  • ० श्वान घटनास्थळापासून दर्ग्यापर्यंत गेले, तेथून पुन्हा ते पडक्या इमारतीमधील खून झालेल्या ठिकाणी आले. दोन वेळा श्वानाने फेऱ्या मारल्या, तेथून ते पुढे जाऊ शकले नाही.

 

रजिया शेख यांना दोन मुली

० रजिया शेख यांना दोन मुली आहेत, त्या विवाहित असून विडी घरकूल परिसरातच राहतात. रजिया शेख या घरात एकट्याच रहात असून त्या बॉन्ड रायटरचे काम करून स्वत:चा उदरनिर्वाह करीत होत्या. आईच्या मृत्यूबाबत समजताच त्या धावत आल्या होत्या, ओक्साबोक्सी रडू लागल्या.

 

शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात महिलेचा खून झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येत आहे. खून कोणी केला? का केला? याचा तपास सुरू आहे. लवकरच सर्व गोष्टी बाहेर येतील.

माधव रेड्डी, सहायक पोलीस आयुक्त.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसCrime Newsगुन्हेगारी