शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा चीनवर टॅरिफ बॉम्ब; धमकीनंतर कोसळला बाजार; अमेरिकेच्या शेअर बाजारात एप्रिलनंतरची मोठी घसरण
2
उद्धवसेनेच्या हंबरडा मोर्चाने छत्रपती संभाजीनगर दणाणले;  शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी १ लाख रुपये द्या - उद्धव ठाकरे
3
जागतिक अस्थिरतेने गुंतवणूकदार मालामाल! गेल्या चार वर्षांत किती वाढले सोने-चांदीचे भाव? जाणून डोळे फिरतील
4
तालिबानचा भेदभाव; काँग्रेसची सरकारवर टीका; महिला पत्रकारांना प्रवेश नाकारल्यावरून राजकारण
5
‘डिजिटल सोने’ घेत नव्या युगात पाऊल टाका 
6
 तालिबानचा पलटवार, अफगाणिस्तान-पाकिस्तान बॉर्डरवर भीषण संघर्ष, अनेक पोस्टवर कब्जा, ५ पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू 
7
निवडणुका महायुती की स्वबळावर; निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिकांना, मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्टीकरण
8
भाजपा, JDUने आपल्या जागा मित्रपक्षांना दिल्या, तरी NDAमधील तिढा सुटेना, नाराज मांझी म्हणाले..      
9
गाझा शांतता करारावर स्वाक्षरी करण्यास हमासचा नकार, ट्रम्प यांच्या प्रस्तावाची उडवली खिल्ली
10
भयानक! आधी प्रेयसीच्या वाढदिवसाचा केक कापला, मग त्याच चाकूने तिचा गळा चिरला
11
जोपर्यंत न्याय नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार होणार नाही, IPS पुरन कुमार यांच्या पत्नीची आक्रमक भूमिका
12
ENG W vs SL W : ...अन् श्रीलंकन कॅप्टनवर आली स्ट्रेचरवरुन मैदानाबाहेर जाण्याची वेळ; जाणून घ्या सविस्तर
13
माझ्या राजकीय कारकिर्दीत मी पाहिलेले पहिले हतबल मुख्यमंत्री म्हणजे उद्धव ठाकरे; बावनकुळेंची टीका
14
शेवटच्या चेंडूपर्यंत थरार, नामिबियाने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला हरवलं, सामन्यात नेमकं काय घडलं?
15
वयाने लहान तरुणाला घरी बोलावून ठेवायची शारीरिक संबंध, मग केली हत्या, महिलेला अटक
16
Nashik: "...शरीरसंबंध ठेव, अन्यथा तुझे फोटो व्हायरल करीन"; मुंबईत विवाहित मैत्रिणीचे व्हिडीओ काढले, घरी जाऊन केला बलात्कार
17
फ्रान्सच्या राजकारणात मोठी उलथापालथ, सेबॅस्टिन लेकोर्नू एका आठवड्यात दुसऱ्यांदा बनले पंतप्रधान
18
"उद्धवजी, हंबरडा राखून ठेवा, महापालिकेतील पराभवानंतर तुमच्या..."; शेलारांचे ठाकरेंना उत्तर
19
या उद्योगातील ५० हजार नोकऱ्या धोक्यात! हळूच जातील जॉब; हा आहे कंपन्यांचा प्लान
20
"राहुल गांधींची जशी अमेठीमध्ये अवस्था झाली होती, तशीच तेजस्वी यादवांची..."; प्रशांत किशोर यादवांच्या बालेकिल्ल्यातून फुंकणार रणशिंग

धक्कादायक; मोहोळच्या कोव्हिड सेंटरला फक्त एकच कर्मचारी; महिला रुग्णांची ससेहोलपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 11:16 IST

त्या महिलेच्या लावला जिल्हाधिकाऱ्यांना फोन; नातेवाईकांच्या संतापानंतर जिल्हाधिकाºयांनी घेतली दखल...!

सोलापूर : मोहोळच्या महिला रुग्णांची शुक्रवारी रात्री प्रशासनाकडून परवड झाली. संतप्त झालेल्या ‘त्या’ रुग्णांनी फोन केल्यावर जिल्हाधिकाºयांनी त्यांच्या उपचाराची व्यवस्था केली व चौकशी केल्यावर मोहोळला कोव्हिड सेंटर नावालाच आसल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. 

मोहोळमधील तीन पॉझीटीव्ह महिला रुग्णांना आरोग्य विभागाच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी उपचारासाठी ताब्यात घेतले. या पथकाने त्यांना अ‍ॅम्बुलन्समधून सिव्हिल हॉस्पीटलमध्ये दाखल केले. शहर व जिल्ह्यातून रुग्ण वाढल्याने या तीन रुग्णांना सिव्हिलच्या डॉक्टरांनी केटरिंग कॉलेजमधील कोव्हिड सेंटरमध्ये रेफर केले. पण या सेंटरमध्ये आधीच ६४ रुग्ण अ‍ॅडमिट व शुक्रवारी दक्षिण सोलापुरातील १८ रुग्णांना उपचारास दाखल करण्यात येणार असल्याने तेथील डॉक्टरांनी त्यांना अ‍ॅडमिट करण्यास नकार दिला. त्यामुळे या तिन्ही महिला आता कुठे जावे या विवंचनेत तेथेच प्रतिक्षेत थांबल्या.

नातेवाईकांना ही माहिती मिळताच त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार यांना संपर्क केला. त्यावर जमादार यांनी प्रांत अधिकारी ज्योती पाटील यांना संपर्क करून या रुग्णांना दाखल करून घेण्याची विनंती केली. पण हे कोव्हिड सेंटर दक्षिण तालुक्यासाठी असल्याने व रुग्ण वाढणार असल्याने त्यांनी जमादार यांच्या विनंतीस नकार दिला. त्यामुळे या तीन रुग्णांना पुन्हा सिव्हिलमध्ये नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्यांना अ‍ॅडमिट करून घेण्यास असमर्थता दर्शविली. त्यामुळे या महिला पुन्हा सिव्हिल हॉस्पीटलच्या फिवर ओपीडीसमोर प्रतिक्षेत बसल्या.  त्यातील एका महिला रुग्णांने थेट जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांना संपर्क करून उपचारासाठी ससेहोलपट होत असल्याची कैफीयत मांडली. जिल्हाधिकाºयांनी दखल घेत त्यांच्या उपचाराची व्यवस्था करण्याचे आदेश दिले. 

मोहोळ कोणाच्या भरवश्यावरआत्तापर्यंत मोहोळमध्ये आढळलेले रुग्ण थेट सिव्हिल हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यामुळे मोहोळला कोव्हिड सेंटर आहे की नाही हे कोणाच्या लक्षात आलेच नाही. शुक्रवारी सर्वांनी टोलवाटोलवी केल्यावर मोहोळचे वैद्यकीय अधिकारी पात्रुडकर यांना महसूलच्या अधिकाºयांनी जाब विचारला. तुमच्या तालुक्यासाठी कोव्हिड सेंटर कोठे आहे विचारताच पात्रुडकर यांना उत्तरच देता आले नाही.  --------------–------------कोव्हिड सेंटर सुरू केले पण एकच कर्मचारी दिला आहे. पॉझीटीव्ह रुग्ण आढळला तर त्याला नेण्यासाठी वाहन नाही. आरोग्य केंद्राच्या मदतीवर काम सुरू आहे. कर्मचारी व वाहन मागणीबाबत पाठपुरावा सुरू आहे. 

डॉ. अरुण पात्रुडकर, वैद्यकीय अधिकारी

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयhospitalहॉस्पिटलHealthआरोग्य