शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक; सोलापुरातील वकील महिलेने हुंडा मागणीच्या जाचामुळे संपविले जीवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 10:49 IST

सोलापुरातील घटना; प्राध्यापक पतीसह सासरच्या चौघांवर गुन्हा दाखल

ठळक मुद्दे स्मिता धनंजय पवार (वय ३१, रा. जुनी पोलीस लाईन, मुरारजी पेठ, सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या महिला वकिलाचे नाव या प्रकरणी आई सीतादेवी विठ्ठल गोवे (वय ५0, रा. उजनी वसाहत पाठीमागे संभाजी नगर, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) यांनी फिर्याद दिली स्मिता यांचे माहेर मंगळवेढा असून त्यांचे लग्न दि.६ मे २०१८ रोजी सोलापुरातील प्रा. धनंजय शिवाजी पवार यांच्या सोबत झाले होते

सोलापूर : सासरच्या त्रासाला कंटाळून वकील असलेल्या महिलेने राहत्या घरी अवघ्या एक वर्षाच्या मुलीला डोळ्यासमोर ठेवून गळफास घेतला. या प्रकरणी आईने दिलेल्या फिर्यादीवरून प्राध्यापक पतीसह सासरच्या चौघांविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार दि.३० जून रोजी रात्री १०.३० ते ११.४३ दरम्यान घडला. 

धनंजय शिवाजी पवार, सासू-शैलजा शिवाजी पवार,नणंद- सविता शिवाजी पवार, नणंद-दीपाली शिवाजी पवार (सर्व रा. जुनी पोलीस लाईन, मुरारजी पेठ, सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. स्मिता धनंजय पवार (वय ३१, रा. जुनी पोलीस लाईन, मुरारजी पेठ, सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या महिला वकिलाचे नाव आहे. या प्रकरणी आई सीतादेवी विठ्ठल गोवे (वय ५0, रा. उजनी वसाहत पाठीमागे संभाजी नगर, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. 

स्मिता यांचे माहेर मंगळवेढा असून त्यांचे लग्न दि.६ मे २०१८ रोजी सोलापुरातील प्रा. धनंजय शिवाजी पवार यांच्या सोबत झाले होते. लग्नानंतर बारीक सारीक गोष्टीवरून पतीसह सासरच्या लोकांनी स्मिता यांना मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. अ‍ॅड. स्मिता पवार यांच्या आई-वडिलांनी सासरी जाऊन जावई व सासू-सासºयांना समजावून सांगितले होते. पुन्हा त्रास सुरू झाला. अ‍ॅड. स्मिता पवार यांना उपाशी ठेवण्यात येऊ लागले. तुझ्या आई-वडिलांनी लग्नात सोने व पैसे कमी दिले असे म्हणत भांडू लागले. त्यानंतर त्यांना माहेरून ५० हजार रुपये घेऊन ये असा तगादा लावला. अ‍ॅड. स्मिता पवार यांनी त्यांच्या आई-वडिलांना सांगितल्यानंतर त्यांनी ५० हजार रुपयांची पूर्तता केली. पैसे देताना वडील विठ्ठल गोवे यांनी माझ्या मुलीला त्रास देऊ नका अशी विनंती केली. त्यानंतर अ‍ॅड. स्मिता पवार यांना त्रास हा कायम सुरूच राहिला. अ‍ॅड. स्मिता पवार यांना मुलगी झाली. सासरी गेल्यानंतर स्मिता यांना पुन्हा त्रास देण्यास सुरूवात केली. 

काम करू दिले जात नव्हतेअ‍ॅड. स्मिता पवार यांनी लॉचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्या जिल्हा व सत्र न्यायालयात प्रॅक्टीससाठी जाण्याचा प्रयत्न करीत होत्या; मात्र पती व सासरच्या लोकांनी त्यांना न्यायालयात काम करण्यास नकार दिला. वकिलाची नोकरी करायची नाही असे बजावले होते.

आत्महत्या करण्यापूर्वी अ‍ॅड. स्मिता पवार यांनी दि.३० जून रोजी रात्री १०.३० वाजता आई-वडिलांना फोन केला होता. रडत रडत त्यांनी होणाºया त्रासाची माहिती आई-वडिलांना दिली होती; मात्र काही वेळेनंतर जावई धनंजय पवार याने सासरे विठ्ठल गोवे यांना फोन केला व स्मिता मुलगी सानवी हिला घेऊन बेडरुममध्ये गेली आहे. आतमध्ये सानवी रडत आहे, अन् स्मिता दरवाजा उघडत नाही असे सांगितले. त्यानंतर मुलगी जास्तच रडत असल्याचा आवाज येत असल्याने दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता अ‍ॅड. स्मिता पवार यांनी गळफास घेतल्याचे आढळून आले. 

टॅग्स :SolapurसोलापूरSuicideआत्महत्याadvocateवकिलCrime Newsगुन्हेगारी