शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक; गौराईसाठी उघड्या ठेवलेल्या घरातून ‘लक्ष्मी’ गेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 14:22 IST

सोलापूर शहरात दोन ठिकाणी चोरी : सात लाखांचा ऐवज लंपास

ठळक मुद्दे घरात महालक्ष्मी असल्यामुळे वाघमारे कुटुंबीय गुरुवारी रात्री घराचा दरवाजा अर्धवट उघडा ठेवून हॉलमध्ये झोपले होतेअज्ञात चोरट्याने उघड्या दरवाजातून घरात प्रवेश करत कपाटामधील सोने-चांदी आणि पाच हजार रुपये रोख असे एकूण ४ लाख ८५ हजार रुपयांचा ऐवज चोरला

सोलापूर :  गुरुनानक चौकातील साई मोटार्स कन्सल्टिंग आॅफिसचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने सव्वादोन लाख रुपयांची रोकड चोरली. चोरी करताना चोराचा चेहरा सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. याबाबत सदर बझार पोलीस ठाण्यात साई मोटार्सचे जहांगीर महेबूब नदाफ (वय ४९, रा. किसन नगर, अक्कलकोट रोड) यांनी फिर्याद दिली आहे. दुसºया एका घटनेत लक्ष्मीसाठी उघड्या ठेवलेल्या घरातून ४ लाख ८५ हजारांची चोरी झाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सोलापूर पोलीस आयुक्तालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या गुरूनानक चौकातील साई मोटार्सचे अज्ञात चोरांनी गुरुवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास दुकान फोडले. या चोरट्यांनी पांढºया रंगाच्या दुचाकीवर दुकानासमोरून दोन वेळा चक्कर मारली. त्यानंतर दुकानासमोर दुचाकी लावून दुकानाचे शटर उचकटून दुकानात प्रवेश करून सीटीटीव्ही कॅमेºयाचे तोंड दुसरीकडे फिरवले. त्यानंतर दुकानातील कपाटात ठेवलेले दोन लाख पंचवीस हजार रुपये घेऊन पसार झाले. ही घटना सकाळी उघडकीस आली. घटनेबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलीस निरीक्षक बजरंग साळुंखे यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेचा तपास सहायक फौजदार घोडके करत आहेत.

जुळे सोलापुरात पाच लाखांची चोरीघरात महालक्ष्मी असल्यामुळे घराचे मुख्य दार उघडे ठेवून झोपले असता अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करत ४ लाख ८५ हजार रुपयांचा ऐवज चोरल्याची घटना विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. याबाबत संतोष नामदेव वाघमारे (वय ४५, रा. गोकुळ सोसायटी, जुळे सोलापूर) यांनी फिर्याद दाखल केली आहे. घरात महालक्ष्मी असल्यामुळे वाघमारे कुटुंबीय गुरुवारी रात्री घराचा दरवाजा अर्धवट उघडा ठेवून हॉलमध्ये झोपले होते. अज्ञात चोरट्याने उघड्या दरवाजातून घरात प्रवेश करत कपाटामधील सोने-चांदी आणि पाच हजार रुपये रोख असे एकूण ४ लाख ८५ हजार रुपयांचा ऐवज चोरला.

टॅग्स :SolapurसोलापूरThiefचोरSolapur City Policeसोलापूर शहर पोलीस