शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

आता तरी माझ्यावर उपचार करा, कोरोनाचा पॉझिटिव्ह अहवाल घेऊनच तो रुग्णालयात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2020 16:38 IST

मुंबईतून आलेल्या कोरोना बाधित रूग्णाने मरवडेतील डॉक्टरांची उडवली झोप

मंगळवेढा : 'हा बघा रिपोर्ट मी कोरोना पॉझिटिव्ह आहे; आता माझ्यावर उपचार करा ' असे म्हणत मरवडे (ता. मंगळवेढा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना पॉझिटिव्ह असलेला रुग्ण चक्क खवे येथून पायी चालत आपल्या मुलासह दाखल झाला. साक्षात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णच समोर उभा पाहून उपस्थित असलेल्या वैद्यकीय सेवा देणाºया कर्मचाºयांबरोबर उपचारासाठी आलेल्या रुग्णांची भंबेरी उडाली. दरम्यान चक्क (बेलापूर) मुंबई येथून मंगळवेढा येथे पोहचलाच कसा असा प्रश्न आहे़ या पॉझिटिव्ह रुग्णाची ट्रॅव्हल हिस्ट्री शोधण्याची डोकेदुखी वाढली आहे.

कर्नाटक राज्याच्या सीमेवर असणाºया मरवडे येथे असणाºया प्राथमिक आरोग्य केंद्रात परिसरातील सर्वसामान्य रुग्णांची  मोठया प्रमाणात वर्दळ या दवाखान्यात असते. आजही सकाळी ओपीडी  सुरू झाल्यानंतर तालुक्यातील खवे गावातील एक रुग्ण (वय ४५) आपल्या मुलासह चालत तेथे दाखल झाला. रुग्ण व मुलाने येथील वैद्यकीय अधिकारी यांची भेट घेत मी सकाळीच बेलापूर येथून आपल्या मूळगावी खवे (ता. मंगळवेढा) येथे आलो आहे. माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आहे, आता माझ्यावर उपचार करा, असे सांगितले. रुग्णाच्या या खळबळजनक विधानानंतर त्या रुग्णाबाबत सविस्तर माहिती विचारली असता आपण बेलापूर येथील एका खाजगी कंपनीत कामाला असल्याचे सांगितले. त्याच्याकडे एका खाजगी लॅबचा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. तो रुग्ण सकाळीच बेलापूर येथून एक खाजगी ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून जवळा (ता. सांगोला) येथे आला व नंतर खवे येथे आला.

कोरोना पॉझिटिव्ह असल्याने मुलांसह मरवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आलो असल्याचे त्याने सांगितले. रुग्णाची खातरजमा केल्यानंतर त्याला व त्याच्या कुटूंबियास सायंकाळी साडेचारच्या सुमारास पुढील कार्यवाहीसाठी मंगळवेढा येथे पाठविण्यात आले. याबाबत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ नंदकुमार शिंदे यांच्याकडे संपर्क साधला असता संबंधित रुग्णाला मंगळवेढा येथे दाखल करण्यात आले आहे. त्याच्याकडे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट असल्याचे सांगितले़ बेलापूर येथे कोरोना पॉझिटिव्ह अहवाल असलेला रुग्ण आपल्या मूळ गावीच कसा येतो याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्याची ट्रॅव्हल हिस्ट्री कशी असणार हे शोधणे प्रशासनाला डोकेदुखी आहे़  

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याMumbaiमुंबईhospitalहॉस्पिटल