शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक; दहा रुपयाच्या माव्यासाठी मित्राने केला मित्राचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 14:42 IST

सोलापुरातील घटना; पोलिसांचा तपास सुरु

ठळक मुद्देआरोपी शकील आणि मुर्तूज या दोघांचे घरे शंभर मीटरच्या अंतरावर आहेतमृताचे नातेवाईकांनी त्याच्या घराजवळ गर्दी केली होतीमुर्तुज शेख (वय ३३, रा. हुसेन नगर) असे मयत इसमाचे नाव आहे.

सोलापूर : दहा रुपयाच्या मावापोटी दोन मित्रांमध्ये किरकोळ भांडण झाले़ या भांडणाचे रुपांतर मारामारीमध्ये झाले, यातच एका मित्राने दुसºया मित्राला ठोसा मारल्यामुळे दुसºया मित्राचा जागीच मृत्यू झाला. मुर्तुज शेख (वय ३३, रा. हुसेन नगर) असे मयत इसमाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गुरुवारी सायंकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास गुरुनानक चौकाजवळील शानदार चौकात मयत मुर्तुज शेख व संशयित आरोपी शकील शेख हे दोघे क्रीडा संकुलाच्या गाळ्या समोर बसले होते. तेव्हा चेष्टा मस्करी मध्ये मावा खाण्याच्या कारणावरून दोघांमध्ये वादावादी सुरू झाली. यावेळी तेथील उपस्थितांनी ही वादावादी मिटवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान दोघांमध्ये धुमशान मारामारी झाली. यात जोराने मार लागल्यामुळे मुर्तुज हा तेथेच जागी कोसळला. त्याला उपस्थितांनी लगेच शासकीय रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद सिव्हिल चौकीत झाली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी लगेच येऊन परिसराची पाहणी केली. सोबतच तेथे असलेल्या सीसीटीव्ही मध्ये घटना कैद झाली आहे का याचा तपास करत आहेत. यावेळी एसीपी प्रीती टिपरे, सदर बाजार चे पोलीस निरीक्षक बजरंग साळुंखे घटनास्थळी दाखल होते.

------------सकाळीच दोघांनी केले एकत्र काम केलेया घटनेतील मयत मुर्तुज व संशयित आरोपी शकील हे दोघे आचारी आहेत. हे दोघे गेल्या आठ ते दहा वषार्पासून विविध कार्यक्रमाचे आॅर्डर घेऊन तेथील जेवण बनवण्याचे काम करतात. त्या दोघांनी गुरुवारी सकाळी ही एक आॅर्डर घेऊन तेथील जेवण तयार करून दिले होते. सायंकाळच्या सुमारास दोघांनीही सिंधी सदृष्य रसायन पिल्यामुळे एकमेकांत वाद झाल्याची माहिती तेथील उपस्थितांनी दिली. दरम्यान, मुर्तुज च्या पश्चात दोन मुले व पत्नी आहे.

-----------शंभर मीटरच्या आतच दोघांची घरेआरोपी शकील आणि मुर्तूज या दोघांचे घरे शंभर मीटरच्या अंतरावर आहेत. दरम्यान मुर्तुज मरण पावला असल्याची माहिती कळताच मृताचे नातेवाईकांनी त्याच्या घराजवळ गर्दी केली होती.

टॅग्स :SolapurसोलापूरMurderखूनCrime Newsगुन्हेगारीSolapur City Policeसोलापूर शहर पोलीस