शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
5
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
6
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
7
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
8
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
9
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
10
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
11
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
12
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
13
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
14
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
15
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
16
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
17
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
18
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

धक्कादायक; लोकांना विवस्त्र करुन अश्लील कृत्य करायला लावणारे चौघे अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2022 16:34 IST

शेणही खाऊ घालत असत : अत्याचार सहन केलेल्यांना ही आवाहन

सोलापूर : गावठी पिस्तूल व गुप्तीचा धाक दाखवून लोकांना जीवे ठार मारण्याची धमकी देत, त्यांना अश्लील कृत्य करण्यास भाग पाडणाऱ्या चौघांना अटक करण्यात आली आहे. जोडभावी पेठ पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या (डीबी) पथकाने ही कारवाई केली असून, २ लाख २० हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सागर अरुण कांबळे (वय २२ रा. न्यू बुधवार पेठ भीम विजय चौक सोलापूर), बुद्धभूषण नागसेन नागटिळक (वय २६ रा. न्यू बुधवार पेठ आंबेडकर उद्यान समोर, आनंद चौक), सतीश उर्फ बाबूलाल अर्जुन गायकवाड (वय २५ रा. १२६, बुधवार पेठ मिलिंदनगर सोलापूर ), अक्षय प्रकाश थोरात (वय २६ रा. मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर न्यू बुधवार पेठ विश्वदीप चौक सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. डीबी पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक केतन मांजरे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की? काही तरुण जुना तुळजापूर नाका ते रुपाभवानी मंदिर दरम्यान येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना जवळील पिस्तुलाचा धाक दाखवून मारहाण व लुटमार करीत आहेत. मिळालेल्या माहितीवरून दिली पथकाच्या पोलिसांनी रुपाभवानी मंदिराकडून जुना तुळजापूर नाकाकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडवर सापळा रचला होता. चौघांना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडून एक गावठी पिस्तूल, धारदार गुप्ती, चार मोबाईल, दोन मोटारसायकली आढळून आल्या. मोबाईलमध्ये मिळालेल्या व्हिडिओची दोन पंचांसमक्ष तपासणी केली असता, त्यामध्ये गावठी पिस्तूलचे व धारदार गुप्तीचा रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना धाक दाखवणे, त्यांना मारहाण व दमदाटी करणे, जीवे ठार मारण्याची धमकी देऊन त्यांना विवस्त्र करणे, अनैसर्गिक अत्याचार करण्यास भाग पाडणे, शेण खाऊ घालने, आदी विक्षिप्त प्रकारचे व्हिडिओ मोबाईलमध्ये आढळून आले. रेकॉर्डिंग करण्यात आलेले व्हिडिओ एकमेकांमध्ये व्हाॅट्सॲपद्वारे प्रसारित केल्याचे दिसून आले.

याप्रकरणी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त हरिश बैजल, पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर , सहायक पोलीस आयुक्त डॉ. संतोष गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब भलचिम, पोलीस निरीक्षक विजयालक्ष्मी कुरी, यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक केतन मांजरे, हवालदार आबा थोरात, पोलीस नाईक सुरेश जमादार, अतुल गवळी, खाजाप्पा अरेनवरू, थिटे, राजेश घोडके, स्वप्नील कसगावडे, गोपाळ शेळके, दत्ता काटे, बाळू माने, बेळे, नागटिळक, सुहास गायकवाड यांनी पार पाडली.

 

पीडित लोकांनी पोलिसांना संपर्क साधावा : डॉ. कडूकर

  • पकडण्यात आलेल्या चौघांनी व त्यांच्या इतर साथीदारांनी अनेक गुन्हे केल्याचे समजते. महिला किंवा पुरुष यांच्या त्रासाला किंवा अत्याचाराला बळी पडले असेल तर त्यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर यांनी पत्रकारांशी बोलताना केले.
  • चौघांना शुक्रवारी चार फेब्रुवारी रोजी अटक करण्यात होती. ५ फेब्रुवारी रोजी चौघांना न्यायालयासमोर हजर केले असता, त्यांना न्यायाधीशांनी १० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे.

 

एक जण पोलिसाचा भाऊ

  • 0 अटक करण्यात आलेल्या चार आरोपींपैकी दोघे ड्रायव्हर आहेत. एकजण मजूर तर दुसरा मंडप व्यावसायिक आहे. एका ड्रायव्हरचा भाऊ ग्रामीण पोलीस दलामध्ये पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहे.
  • 0 अक्षय थोरात याच्याविरुद्ध यापूर्वी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत. अन्य तिघांच्या नावे सध्या तरी गुन्हे दाखल असल्याचे दिसून येत नाही.
  • 0 अटक करण्यात आलेल्या चौघांची एक मोठी गॅंग असून यामध्ये १५ ते १६ तरुणांचा समावेश आहे. पोलिसांनी आरोपींचा ही शोध घेत आहेत.
  • गुन्हा दाखल न करण्यासाठी नेत्यांचा दबाव
  • 0 अटक केल्यानंतर त्यांना सोडवण्यासाठी काही राजकीय पुढारी पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. गुन्हा दाखल करू नका काय आहे ते मिटवून घेऊ अशी ऑफर पोलिसांना देत होते. पोलीस ऐकत नाही म्हटल्यानंतर त्यांना पुढे तुम्हाला कधी तरी अडचण येईल अशी धमकी वजा सूचना देत होते अशी माहिती पोलीस सूत्रांकडून समजते.
टॅग्स :SolapurसोलापूरSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसCrime Newsगुन्हेगारी