शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक; आधी गळा दाबला अन् नंतर पाठीला दगड बांधून दोघांनी विहिरीत टाकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2022 16:18 IST

वाखरी खून प्रकरणाचा उलगडा : दोघे ताब्यात, पाच दिवसांची पोलीस कोठडी

पंढरपूर : प्रेमप्रकरणातून दोघा मित्रांनी लखन गांडुळे या मित्राचा गळा दाबून खून केला. नंतर त्याचे हातपाय नायलॉनच्या दोरीने बांधले आणि पाठीला भलामोठा दगड बांधून विहिरीत टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी पाच तासांतच या प्रकरणाचा छडा लावला. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे. संशयित आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी दिली.

लखन सुनील गांडुळे (वय २५, रा. भंडीशेगाव, ता. पंढरपूर) हा बेपत्ता असल्याची फिर्याद त्याचा भाऊ शंभू गांडुळे यांनी पोलिसांत दिली होती. सोमवार, २२ रोजी लखन गांडुळे याचा मृतदेह वाखरी हद्दीतील एका विहिरीत हातपाय दोरीने बांधलेल्या व दगड पाठीला बांधलेल्या अवस्थेत सापडला. पोलिसांकडून ओळख पटवण्याचा प्रयत्न झाला. मृत व्यक्ती ही भंडीशेगाव येथील लखन गांडुळे असल्याचे स्पष्ट झाले. याबाबत लखनचा भाऊ शंभू याने पोलिसांत फिर्याद दिली. या प्रकरणात लखन गांडुळे याच्या दोन मित्रांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी खाक्या दाखवताच तसेच तपास करताच युवराज सातपुते व तुषार मेटकरी या संशयित आरोपींनी खुनाची कबुली दिली.

---

खून लपवण्यासाठी दोरी आणली

युवराज सातपुते याचे लखन गांडुळे याच्याबरोबर भांडण झाले होते. दोघांचे भांडण हे प्रेम प्रकरणावरून झाले होते. मात्र पुन्हा त्यांच्यात भांडण झाल्याने युवराज सातपुते व तुषार मेटकरी या दोघांनी लखनचा गळा दाबून खून केला. हा प्रकार कोणाला कळू नये म्हणून त्यांनी नायलॉनची दोरी आणली आणि हातपाय बांधले. लखनच्या मृतदेहाच्या पाठीला दगड बांधला व वाखरी येथील याकूब शेख यांच्या विहिरीत टाकून दिला. आरोपींना मंगळवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

----

 

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरCrime Newsगुन्हेगारी