शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

धक्कादायक; वटपोर्णिमेच्यादिवशीच महिलेनी केली विहिरीत उडी मारून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 14:46 IST

माढा तालुक्यातील घटना

कुर्डूवाडी : लऊळ (ता. माढा) येथील राहत्या घरातून कुर्डुवाडीला दवाखान्याच्या कामासाठी निघालेल्या महिलेने गावच्या शिवारातील सीना माढा उपसा सिंचन कॅनोलनजीक असणाऱ्या विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सकाळी  ९ वाजण्याच्या सुमारास घडली. रुक्मिणी नवनाथ देवकर (वय-४५) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. नेमके वटपौर्णिमेच्याच दिवशी ही घटना घडल्यामुळे परिसरातील महिलावर्गातून हळहळ व्यक्त होत आहे. 

आत्महत्या केलेल्या महिलेचे पतीला बुधवारी सायंकाळी अर्धांगवायुचा दुसरा झटका आल्याने कुर्डुवाडीतील एका खासगी दवाखान्यात उपचार घेत आहेत. त्यामुळे मयत महिला गुरूवारी सकाळी ९ च्या दरम्यान घरातून दवाखान्यात जाते म्हणून मुलांना सांगून निघाली होती. दरम्यान रस्त्यातच तिने विहिरीच्या कठड्यावर चप्पल ठेऊन उडी मारून आत्महत्या केली.

या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळावर कुर्डुवाडी पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक हनुमंत वाघमारे यांनी धाव घेतली. सदर घटनेचा पंचनामा करुन महिलेला विहिरीतून बाहेर काढले व येथील शवविच्छेदनासाठी कुर्डुवाडी ग्रामीण रूग्णालयात पाठविण्यात आले. तिच्या पश्चात पती,दोन मुले असा परिवार आहे.

 

 

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारीSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस