शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक; कोरोनाचे गीत गाताना कोरोनानेच गीतकाराचा सोलापुरात दुर्दैवी मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 13:22 IST

'कोरोना रोगम मर्मम तेललुचको रन्ना' ; कोरोना संदर्भातील कविता सोशल मिडियावर व्हायरल

सोलापूर : कोरोनाच्या महाभयंकर संकटापासून बचाव करण्यासाठी स्वरचित जनजागृतीपर गीत गाणारे गीतकार पुंडलिक दोमल यांना कोरोनाची लागण झाल्याने अवघ्या पाच सहा दिवसातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. 

लॉकडाउन आणि संचारबंदीमुळे घरातच बसून असलेल्या पुंडलिक दोमल यांना कोरोनाचे भयंकर रौद्ररूप व दगवणारी माणसे यामुळे असह्य वेदना होत होते, त्यापासून बचाव करण्यासाठी त्यांच्यातील कवीमन जागृत झाले. कोरोनामुळे शहरात सर्वात जास्त मृत्यू तेलुगू भाषिक पट्ट्यात होताना दिसत होते. 

प्रबोधन या भागातील लोकांमध्ये व्हावे या उद्देशाने त्यांनी जनजागृतीपर कविता तेलगुतून लिहिली. दोमल हे तेलुगू भाषिक असून मराठी आणि तेलुगू भाषेवर त्यांचे प्रभुत्व आहे. मराठीतून ही कविता भाषांतरीत करण्याअगोदर कोरोनाने त्यांचा पाश आवळला. तेलुगू भाषिक असलेल्या पूर्व भागातील संक्रमित रुग्णांची वाढती संख्या, उपचाराविना तडफडून मरणाऱ्यांची संख्या त्यांना अस्वस्थ करीत होती, यापासून बचावासाठी  गीताच्या माध्यमातून लोकांचे प्रबोधन, जनजागृती करावे यासाठी  त्यांच्यातील कविमन आतुर होते. 'कोरोना रोगम मर्मम तेललुचको रन्ना' अर्थात कोरोनाचे मर्म ओळखून त्याचे संक्रमण रोखू या, त्याची लढा देऊ या अशा आशयाची ही कविता तयार झाली.

दोमल स्वतः गायक असल्याने त्यांनी तेलगू लोकगीतांच्या चालीवर गावुन त्याचे रेकॉर्डिंग केले आणि सोशल मीडियावर ते गीत व्हायरल  होताच हजारो लाइक्स, शेअर्स मिळत होते, गीताच्या सुंदर रचनेबद्दल व सुरेल गायनाबद्दल  दोमल यांना लोक फोनवरून कोतुक करीत असतानाच त्यांचे फोन घेणे बंद झाले, ते आजारी पडले किरकोळ ताप आणि निमोनियची लक्षणे आढळून आले, उपचारानंतर ते बरे झाले तात्पुरते. पुन्हा ताप आला तेंव्हा कोरोनाची लक्षणे दिसून आली, त्यानं उपचारासाठी यशोधरा रुग्णालयात दाखल करण्यात आले. अवघ्या चार दिवसातच कोरोनाशी लढण्यासाठी प्रबोधनपर गीत गायन करणाऱ्या या कलावंताचा कोरोनाने बळी घेतला. त्यानी गायलेले 'श्री मार्कंडेय चरित्र गान' संपूर्ण आंध्र, तेंलगना सह संपूर्ण भारतात लोकप्रिय आहेत. त्याच्या हजारो सीडी, डीव्हीडी प्रकाशित झाल्या आहेत.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याSocial Mediaसोशल मीडिया