धक्कादायक; शासकीय रूग्णालयात रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2020 12:03 PM2020-09-15T12:03:08+5:302020-09-15T12:04:59+5:30

जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम समितीचे सभापतींचा आरोप; इंजेक्शन कुणासाठी हिशोब नाही

Shocking; Black market of remedivir injection in government hospital | धक्कादायक; शासकीय रूग्णालयात रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार

धक्कादायक; शासकीय रूग्णालयात रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार

Next
ठळक मुद्देजिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर झाली असल्याबाबत झेडपी अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी चिंता व्यक्त केलीग्रामीणमध्ये सध्या कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. रुग्णांना बेड व आॅक्सिजनचा साठा कमी पडत आहेआरोग्य विभागाचे नियोजन दिसत नाही. एका रुग्णाला रेमडेसिविर इंजेक्शनची गरज होती.

सोलापूर : कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने केलेल्या साहित्य खरेदीत मोठी गडबड आहे. त्याचबरोबर सेस फंडातून खरेदी केलेली औषधे जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या ताब्यात देण्यात आली व सिव्हिलमध्ये यातील रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करण्यात येत आहे, असा आरोप जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम समितीचे सभापती विजयराज डोंगरे यांनी सोमवारी केला.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांचे आरोग्य अबाधित रहावे, या दृष्टिकोनातून जिल्हा परिषद पदाधिकाºयांनी आरोग्य विभागाच्या सर्व साहित्य व औषध खरेदीला कोणताही आक्षेप न घेता मंजुरी दिली. त्यामुळे प्रशासनाने याचा फायदा घेत अव्वाच्या सव्वा दराने साहित्य खरेदी केल्याचे दिसून येत आहे. सॅनिटायझर, आॅक्सिमीटर, थर्मल गन यांच्या किमती बाजारापेक्षा जास्त लावण्यात आल्या आहेत. अँटिजेन किटची महापालिका, शल्यचिकित्सक यांच्याकडून माहिती घेतली जात आहे. रुग्णांसाठी नेबुलायझर खरेदी केले, ते कुठे आहेत व त्याचा वापर सुरू आहे काय, याचा शोध घेतला जात आहे. साहित्य व औषध खरेदीवर कोणाचेच नियंत्रण नसल्याचे दिसू येत असून, यासंबंधी दोषी असलेल्या सर्व अधिकाºयांवर कारवाई करण्यात यावी, अशी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे मागणी करणार असल्याचे डोंगरे यांनी स्पष्ट केले.

जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून औषध खरेदीसाठी १ कोटी दिले. तसेच जिल्हा नियोजनमधून निधी दिला. बाजारात रेमडेसिविर इंजेक्शन पन्नास हजाराला असताना पंचाहत्तर हजाराने खरेदी झाली आहे. याशिवाय हे इंजेक्शन कोणासाठी वापरले याचा हिशोब सांगितला जात नाही. हे इंजेक्शन काळ्याबाजाराने खासगी रुग्णालयात अ‍ॅडमिट असलेल्या रुग्णांना पुरविले याची धक्कादायक माहिती माझ्याकडे आहे, असे डोंगरे यांनी सांगितले.

कोण हे डॉ. मस्के
ग्रामीणमध्ये सध्या कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. रुग्णांना बेड व आॅक्सिजनचा साठा कमी पडत आहे. यावर आरोग्य विभागाचे नियोजन दिसत नाही. एका रुग्णाला रेमडेसिविर इंजेक्शनची गरज होती. जिल्हाधिकाºयांना फोन केल्यावर त्यांनी मला शल्यचिकित्सक डॉ. ढेले यांचा नंबर दिला. त्यांनी सिव्हिलचे डॉ. मस्के यांचा नंबर दिला. त्यांचाही मोबाईल बंद होता. कोण हे डॉ. मस्के मला माहिती नाही, पण सामान्य रुग्णांनी कोणाच्या भरवशावर राहायचे, असा सवाल डोंगरे यांनी यावेळी उपस्थित केला.

परिस्थिती गंभीर : कांबळे
जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर झाली असल्याबाबत झेडपी अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी चिंता व्यक्त केली. लोक रात्री-अपरात्री फोन करीत आहेत. सोलापूर व बार्शीत बेड शिल्लक नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे जिल्हाधिकाºयांनी ही बाब गांभीर्याने घ्यावी, अशी त्यांनी मागणी केली. 

छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात रेमडेसिविर औषधे व्यवस्थित सांभाळून ठेवली जातात. ज्या  रुग्णाला हे औषध द्यायचे आहे, त्याच्या नावासह नोंद करून ठेवली जाते. औषधे देताना त्या रुग्णाला गरज किती आहे. हे तपासून औषध दिले जाते. या सर्व औषधांच्या नोंदी रुग्णालयाकडे आहेत.
- डॉ. औदुंबर मस्के, 
वैद्यकीय अधीक्षक, 

Web Title: Shocking; Black market of remedivir injection in government hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.