शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक; माण खोऱ्यातील ७१ लाखाच्या माडग्याळ मेंढ्याचा उपचार दरम्यान मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 10:07 IST

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

सांगोला :  माण खोऱ्यातील ज्या माडग्याळ मेंढ्याला ७१ लाखांची बोली आली होती, त्या सर्जा मेंढ्याचा उपचारादरम्यान गुरुवारी स.११:३० च्या सुमारास मृत्यू झाला. सर्जा च्या अचानक जाण्यामुळे मेटकरी कुटुंबिया समवेत सांगोला चांडोलेवाडी  परिसरात शोककळा पसरली आहे.

सांगोला चांडोलेवाडी येथील मेंढपाळ बाबुराव मेटकरी यांनी माडग्याळ जातीचा मेंढा पाळला होता.त्याचे नाव "सर्जा" ठेवले होते . त्याचे नाक राघूच्या चोचीसारखे असल्यामुळे त्याला मागणीही होती आणि सर्वांचे लक्ष वेधून घेत होता . बाबुराव मेटकरी वर्षाकाठी मेंढ्याच्या व्यवसायातून सुमारे ५०  लाखाचे उत्पन्न मिळवत होते. त्यांच्याकडे असणाऱ्या या सर्जा मेंढ्याला आटपाडीच्या बाजारात सुमारे ७१ लाख रुपयांना मागणी आल्याने " सर्जाने " चांगलाच भाव खाल्ला होता. कितीही किंमत आली तरी मेंढा विक्री करण्याचा बाबू मेटकरीचा विचार नव्हता. त्याच्यापासून जातिवंत पिल्ली, मादी व नर पैदास करण्यासाठी तो ठेवला होता.

गेल्या आठवड्यात त्यास निमोनियाची लागण झाल्याने त्याच्यावर कासेगाव ता. पंढरपूर येथे वैद्यकीय दवाखान्यात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान गुरुवारी स.११:३० वाजता सर्जाचा मृत्यू झाला . त्याचा मृत्यू झाल्याची माहिती कुटुंबीयांना समजताच अश्रू अनावर झाले सर्जाला अगदी स्वतःच्या मुला प्रमाणे वाढवला होता तो कुटुंबातील एक प्रकारचा सदस्यच बंद होता त्यामुळे सर्जा नुसता सांगोल्यात नव्हे तर माण खोऱ्यासह कर्नाटका पर्यंत प्रसिद्ध होता. त्याच्यावर चांडोली वाडी येथे मेटकरी कुटुंबीयाने शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार केले.

टॅग्स :Solapurसोलापूरsangole-acसांगोला