शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

'युती गेली खड्ड्यात म्हणणारी शिवसेना सत्तेसाठी लाचार, आमची मनसेसोबत आघाडी नाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2019 08:05 IST

अशोक चव्हाण यांची टीका; आघाडीच्या जागावाटपाचे चित्र आठवड्यात स्पष्ट होणार

सोलापूर : युती गेली चुलीत, उखाड देंगे- फेक देंगे, अशी हमरीतुमरीची भाषा करीत शिवाजी पार्कवर झालेल्या सभेत स्वबळाचा नारा देणारी शिवसेना आज सत्तेसाठी लाचार झाल्याचे दिसून येत आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केली.

शिवसेनेचा भाजपाविरोध किती पोकळ होता, हे यावरून दिसून येईल. समृद्धी महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेवेळी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या भाषणाला शिवसेनेने तीव्र विरोध केला होता. त्यानंतर कॅबिनेटमध्ये चर्चा करून समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची इच्छा शिवसेनेने व्यक्त केली.

शिवसेनेची दुटप्पी भूमिका घेतल्याची अशी अनेक उदाहरणे आहेत. शिवसेनेने इतके वाभाडे काढूनसुद्धा भाजपा त्यांच्यासोबत जाते, यामध्ये दोघांची लाचारी दिसून येते. शिवसेनेच्या बाबतीत अमित शहा व इतरांनी केलेली भाषणे पाहता सर्वसामान्यांनाही यांच्या युतीबद्दल धक्का बसला आहे. सत्तेसाठी हपापलेली शिवसेना इतका अपमान झाल्यावरही भाजपासोबत जाते. केवळ स्वत:चे अस्तित्व टिकविण्याची वेळ आल्याने सत्तेसाठी शिवसेना लाचार होताना दिसत आहे. मित्रपक्षांबरोबर काँग्रेसची आघाडी मात्र फक्त लोकसभेपुरती होणार असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले. आघाडीच्या जागा वाटपाचे चित्र आठवड्यात स्पष्ट होईल, असेही ते म्हणाले.मनसेबरोबर आघाडी नाहीकाँग्रेस व मनसेचे तात्त्विक मतभेद आहेत ते दूर झालेले नाहीत. मुंबईचा मनसेचा इतिहास पाहता आपण आघाडीबाबत अजिबात उत्सुक नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी मनसेबाबत आघाडीचे वक्तव्य केले होते, आम्ही त्याला होकार कळविलेला नसल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणcongressकाँग्रेसShiv Senaशिवसेना