शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरातील शेळगी, अयोध्या नगरी, बापूजी नगर, कुर्बान हुसेन झोपडपट्टी सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 14:16 IST

सोलापूर शहर पोलिसांचा कडक बंदोबस्त; कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढली...!!

सोलापूर : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोमवारी सकाळी शहरातील बापूजी नगर, कुर्बान हुसेन झोपडपट्टी, शेळगी आणि हैदराबाद रोडवरील अयोध्या नगर हा भाग पोलिसांनी सील केला आहे.

शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर तेलंगी पाच्छापेठ,  रविवार पेठ, इंदिरा नगर हा भाग देखील सील केल्यानंतर सोमवारी सकाळी सदर बझार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुर्बान हुसेन नगर झोपडपट्टी, बापूजी नगर, एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अयोध्या नगर आणि जोडभावी पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेळगी हा परिसर पोलिसांनी सील केला आहे. या भागातील काही रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या आदेशावरून परिसरात सेटिंग लावून पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये हा परिसर सील केला आहे.

सकाळपासून पोलिसांनी या भागात असलेले सर्व रस्ते लोखंडी बॅरिकेड्स व लोखंडी अँगल लावून बंद केले आहेत. या भागातील अत्यावश्यक सेवा देणारी सर्व दुकाने मेडिकल हॉस्पिटल बंद करण्यास सांगितले आहे. परिसरामध्ये राहणाऱ्या लोकांना बाहेर येऊ दिले जात नाही. बाहेरील लोकांना आतमध्ये प्रवेश दिला जात नाही. लोकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन पोलिसांकडून वारंवार केले जात आहे. संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, अधिकारी, कर्मचारी, पोलीस व्हॅनमधून फिरून लोकांना बाहेर न येता घरात बसण्याचा सल्ला देत आहेत.---------------------------------------कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील काही भाग सील करण्यात आले आहेत. ज्या भागाला सील करण्यात आले आहे, त्या भागातील काही रुग्ण सध्या उपचारासाठी रुग्णालयांमध्ये दाखल आहेत. त्यांचे पॉझिटिव्ह रिपोर्ट्स प्रशासनाला प्राप्त झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून परिसर संपूर्णतः सील करण्यात आला आहे.- अंकुश शिंदे,

पोलीस आयुक्त, सोलापूर शहर

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस