शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

शितल तेली-उगले यांची बदली; सचिन ओम्बासे सोलापूरचे नवे मनपा आयुक्त

By appasaheb.patil | Updated: February 18, 2025 21:33 IST

२१ नोव्हेंबर २०२२ मध्ये शितल तेली-उगले या सोलापूर महापालिका आयुक्त पदावर रूजू झाल्या होत्या. त्यांच्या काळात महापालिकेतील भरती प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडली...

सोलापूर : महापालिका आयुक्त शितल तेली-उगले यांची बदली झाली असून त्यांच्या जागी धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश अपर मुख्य सचिव (सेवा) व्ही. राधा यांच्या सहीने १८ फेब्रुवारी २०२५ रोजी काढण्यात आले आहेत. दरम्यान, शितल तेली-उगले यांची नियुक्ती प्रतिक्षेत असल्याचे सांगण्यात आले. 

२१ नोव्हेंबर २०२२ मध्ये शितल तेली-उगले या सोलापूर महापालिका आयुक्त पदावर रूजू झाल्या होत्या. त्यांच्या काळात महापालिकेतील भरती प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडली. याशिवाय उजनी-सोलापूर दुहेरी जलवाहिनीच्या कामांना गती मिळाली. याचबरोबर  स्मार्ट सिटी, परिवहन सेवा, स्वच्छता विभाग, बांधकाम विभाग, शहरातील मुख्य रस्ते, चौकाचौकाचे सुशोभिकरण, महापालिकेतील इंद्रभुवन इमारतीचे नूतनीकरण, स्काडा प्रणाली, इंदिरा गांधी स्टेडियम, शहरातील आरोग्य केंद्राचे नुतनीकरणही मोठया प्रमाणात करण्यात आले. उगले यांनी शहरातील विकासकामांना महत्व दिले. शासनाकडून मोठया प्रमाणावर निधी खेचून आणण्यात त्यांना यश मिळाले. 

ओम्बासे लवकरच पदभार घेणार -धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांना मुख्य सचिव व्ही. राधा यांनी आदेशात सांगितले आहे की, सध्याच्या पदाचा कार्यभार विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर विभाग यांच्या सल्ल्याने अन्य अधिकार्यांकडे सोपवून नवीन पदाचा कार्यभार तेली-उगले यांच्याकडून स्वीकारावा असे नमूद केले आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात ओम्बासे हे महापालिका आयुक्त पदाचा पदभार स्वीकारणार असल्याचे सांगण्यात आले.

 

टॅग्स :Solapurसोलापूर