शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या दौºयामुळे शरद पवारांचा कार्यक्रम लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 14:29 IST

कार्यकर्त्यांचा सोलापुरात होणार मेळावा; राजकीय उलथापालथ होण्याची चर्चा 

ठळक मुद्देमुख्यमंत्री ठाकरे कोरोना साथीच्या संकटानंतर प्रथमच सोलापूर दौºयावर येत आहेतसाथीचा आढावा व खासगी कार्यक्रमास उपस्थिती असा त्यांचा दौरा असल्याचे सांगितले जात आहेराष्ट्रवादीचे नेते खासदार पवार हेही खासगी कार्यक्रमाबरोबरच शहरात कार्यकर्त्यांच्या मेळाव्यालाही हजर राहणार आहेत

सोलापूर : जिल्हा प्रशासनाकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य दौºयाचा कार्यक्रम आल्यामुळे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, खासदार शरद पवार यांचा १० आॅक्टोबरचा दौरा लांबणीवर गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. दरम्यान, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शुक्रवारी जाहीर केलेला नियोजित दौराही अचानक रद्द केल्यामुळे या चर्चेला बळ मिळाले आहे. 

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर कोरोना महामारीचे संकट आले. त्यामुळे महामारीच्या उपाययोजनेत प्रशासकीय यंत्रणा गुंतली व राजकीय हालचाली मंदावल्या होत्या. आता लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्यावर कोरोना साथीचा उद्रेक मंदावल्याचे दिसून आल्यावर राजकीय हालचाली वाढल्या आहेत.

कोरोना साथीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांनी सोलापूर दौरा केला होता. त्यानंतर गेल्या आठवड्यात ते पंढरपूर दौºयावर आले होते. या दौºयातच त्यांनी १०   आॅक्टोबर रोजी सोलापूर दौºयाचे सूतोवाच केले होते. त्यामुळे पवार यांच्या दौºयाबद्दल कुतूहल वाढले आहे.

एमआयएमच्या नगरसेवकांनी मुंबईत त्यांची घेतलेली भेट व शिवसेना नेत्याच्या कार्यक्रमाला हजेरी हे विषय चर्चेचे झाले आहेत. नियोजित तारीख जवळ आली तरी खासदार पवार यांच्या दौºयाबाबत अधिकृत कार्यक्रम न आल्याने संबंधित कार्यक्रम संयोजकांकडे विचारणा केली असता मुख्यमंत्री ठाकरे यांचाही २४ आॅक्टोबर रोजी दौरा ठरत असल्याने नियोजित कार्यक्रम पुढे गेल्याचे सांगितले.या पार्श्वभूमीवर हे दोन्ही नेते एकाचवेळी सोलापुरात येतील, असे आता सांगितले जात आहे. राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष उमेश पाटील यांनी खासदार पवार यांचा अधिकृत दौरा अद्याप आला नसल्याचे स्पष्ट केले असले तरी या दौºयाकडे अनेक नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे़ अनेकांनी निवेदनांची तयारी चालवली आहे़  

सोलापुरात होणार मेळावेमुख्यमंत्री ठाकरे कोरोना साथीच्या संकटानंतर प्रथमच सोलापूर दौºयावर येत आहेत. साथीचा आढावा व खासगी कार्यक्रमास उपस्थिती असा त्यांचा दौरा असल्याचे सांगितले जात आहे. राष्ट्रवादीचे नेते खासदार पवार हेही खासगी कार्यक्रमाबरोबरच शहरात कार्यकर्त्यांच्या मेळाव्यालाही हजर राहणार आहेत. या मेळाव्यात बरीच राजकीय उलथापालथ होण्याची चर्चा सुरू झाली आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरUddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवारtourismपर्यटन