शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवार शनिवारी सोलापूर दौऱ्यावर; जाणून घ्या काय आहे त्यांच्या दौऱ्याचे कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 12:25 IST

सोलापूर लोकमत ब्रेकींग

सोलापूर - माजी केंद्रीय कृषीमंत्री व राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख शरद पवार हे शनिवारी सोलापूर दौऱ्यांवर येत आहेत. नान्नज (ता. उत्तर सोलापूर) येथील कृषिभूषण नानासाहेब काळे यांनी विकसित केलेल्या किंगबेरी या नव्या वाणाचा लोकार्पण सोहळा शरद पवारांच्या उपस्थितीत होत आहे. 

दरम्यान, शरद पवार हे हेलिकॉफ्टरने नान्नज येथे आगमन होणार आहे. त्यानंतर कार्यक्रमाला उपस्थित राहून परत ते बारामतीकडे रवाना होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या कार्यक्रमाला या कार्यक्रमाला माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील, सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, कृषी मंत्री दादा भुसे, सहकार व पणन मंत्री शामराव पाटील, सोलापूर जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते बळीराम काका साठे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे तर सोलापूरचे खासदार डॉ.जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी,आ.बबनदादा शिंदे, आ. विजयकुमार देशमुख, आ. सुभाष देशमुख,आ.प्रणिती शिंदे, आ.यशवंत माने, आ. संजयमामा शिंदे,आ.प्रशांत परिचारक, आ. अनिल बाबर, आ. रोहित पवार, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायत संघाचे अध्यक्ष राजेंद्र पवार, उपाध्यक्ष शिवाजीराव पवार,खजिनदार कैलास भोसले, अखिल भारतीय द्राक्ष बागायत संघाचे अध्यक्ष सोपान कांचन, मध्यवर्ती विज्ञान समितीचे चेअरमन अरविंद कांचन, माजी आमदार राजन पाटील, दिलीप माने, माजी आ. अर्जुन खोतकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

टॅग्स :SolapurसोलापूरSharad Pawarशरद पवारPoliticsराजकारण