शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवार बारामतीतून मुंबईकडे, पंढरपूर दौरा रद्द

By राकेश कदम | Updated: October 23, 2023 11:46 IST

शरद पवार यांच्या उपस्थितीत माढा तालुक्यात शेतकरी मेळावा आणि पंढरपूर शहरात महाविकास आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे उपस्थित राहणार होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा सोमवारचा माढा आणि पंढरपूर तालुक्यातील दौरा अचानक रद्द झाला. महविकास आघाडीच्या मुंबईतील कोअर कमिटीच्या बैठकीसाठी पवार बारामती हून माढाला येण्याऐवजी मुंबईकडे रवाना झाले अशी माहिती पक्षाचे राज्य निरीक्षक शेखर माने यांनी दिली.

शरद पवार यांच्या उपस्थितीत माढा तालुक्यात शेतकरी मेळावा आणि पंढरपूर शहरात महाविकास आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे उपस्थित राहणार होते. शिंदे आणि काँग्रेसचे पदाधिकारी पंढरपूरला जाण्याच्या तयारीत होते. या दरम्यानच शरद पवारांचा दौरा रद्द झाल्याची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माढा आणि पंढरपूर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी ही शरद पवारांच्या दौऱ्याची जय्यत तयारी केली होती. राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा सोमवारी माढा तालुक्यातील शेतकरी मेळाव्याला येणार आहेत. त्यामुळे दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये आपापले मेळावे यशस्वी करण्याची चुरस लागली होती. यादरम्यान, शरद पवारांचा दौरा रद्द झाल्याचा निरोप आला. माढा तालुक्यातील नेते शरद पवार यांना‌ हा दौरा रद्द करु नये अशी विनवणी करीत असल्याचे सांगण्यात आले. मात्र पवारांचा दौरा रद्द झाला.सोमवारचा दौरा झाला असला तरी लवकरच नवी तारीख होईल, असे पक्षाचे निरीक्षक शेखर माने यांनी सांगितले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारBaramatiबारामतीMumbaiमुंबईNCPराष्ट्रवादी काँग्रेस