शरद पवारांना राष्ट्रीय प्रश्नांसाठी वेळ मिळतो,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:23 AM2021-01-03T04:23:35+5:302021-01-03T04:23:35+5:30

सोलापूर : शरद पवार राष्ट्रीय नेते आहेत. त्यांच्यासमोर अनेक प्रश्न असतात. शेतकरी आंदोलनासारख्या प्रश्नासाठी त्यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली, मात्र ...

Sharad Pawar gets time for national issues, | शरद पवारांना राष्ट्रीय प्रश्नांसाठी वेळ मिळतो,

शरद पवारांना राष्ट्रीय प्रश्नांसाठी वेळ मिळतो,

Next

सोलापूर : शरद पवार राष्ट्रीय नेते आहेत. त्यांच्यासमोर अनेक प्रश्न असतात. शेतकरी आंदोलनासारख्या प्रश्नासाठी त्यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली, मात्र मराठा आंदोलनासाठी त्यांच्याकडे वेळ नाही, अशी उपरोधिक टीका शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी सोलापुरात बोलताना केली.

राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार मराठा आरक्षण प्रश्नाकडे गांभीर्याने पाहत नाही. वास्तविक त्यांची जबाबदारी असते. फडणवीस यांनी दिलेले आरक्षण चुकीचे असल्याची चर्चा केली जाते, मग त्यावेळी त्यात दुरुस्ती का सुचवली गेली नाही? असा सवाल करीत आरक्षण मिळाले तेव्हा मंत्रिमंडळातील किती जणांनी आनंद व्यक्त केला होता. राजकीय श्रेयवादासाठी मराठा आरक्षणाचा विषय बाजूला केला जात असेल तर पुढची पिढी माफ करणार नाही. केंद्र सरकार किंवा न्यायालयाला दोष देण्यामागचा हेतू आरक्षण अबाधित ठेवण्याऐवजी घोळ घालण्याचा दिसतो, असा आरोप आ. मेटे यांनी केला.

अशोक चव्हाणांना उपसमितीवरून बाजूला काढल्याशिवाय आरक्षणावर मार्ग निघेल असे वाटत नाही. काँग्रेसला मराठा समाजापेक्षा ओबीसींची चिंता अधिक आहे. म्हणूनच विजय वडेट्टीवार मैदानात उतरले आहेत. राष्ट्रवादीला तीच चिंता आहे, त्यामुळेच छगन भुजबळ यांना ओबीसींची वोट बँक टिकवण्यासाठी पुढे करण्यात आल्याची टीका आ. मेटे यांनी केली. शरद पवारांनी अथवा सरकारने या प्रश्नाला प्राधान्यक्रम देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला शिवसंग्रामचे सरचिटणीस तानाजी शिंदे, सुनील रसाळे यांची उपस्थिती होती.

-------

मुख्यमंत्र्यांसमवेत नेत्यांची बैठक

राज्य लोकसेवा आयोगाने मराठा उमेदवाराबाबत घेतलेला निर्णय चुकीचा आहे. ईडब्ल्यूएसमुळे होणारे फायदे तोटे, सुरू असलेली शासकीय नोकरभरती आणि यापूर्वी भरती प्रक्रिया पूर्ण केलेल्या उमेदवारांना अभय देण्याच्या मागण्यांसाठी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. चार-पाच दिवसांत समाजातील सर्व नेत्यांना एकत्र बोलावून त्यावर चर्चा घडवून आणावी, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यासाठी सर्वांशी आपला संपर्क सुरू असल्याचेही आ.मेटे यांनी सांगितले.

Web Title: Sharad Pawar gets time for national issues,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.