आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २८ : फताटेवाडी येथील एनटीपीसीमुळे सोलापूरच्या तापमानात कसलीही वाढ होणार नाही़ याउलट परिसरातील उपाययोजनांमुळे २ अंशाने तापमानाची घट होईल, असा दावा एनटीपीसीचे महाप्रबंधक नव कुमार सिन्हा यांनी केला आहे़ मात्र, त्यासाठी पाच वर्षे वाट पाहावी लागेल, अशी पुष्टी त्यांनी जोडली़ सोलापूरचे खासदार अॅड़ शरद बनसोडे यांनी आज एनटीपीसी प्रकल्पाला भेट दिली़ त्यांच्या हस्ते इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनचा कोनशिला समारंभ पार पडला़ पर्यावरण अनुकूलतेला प्रोत्साहन देण्यासाठी या चार्जिंग स्टेशनची स्थापना करण्यात येत आहे़ महाप्रबंधक नव कुमार सिन्हा यांनी खा़ शरद बनसोडे यांचे स्वागत केले़ एनटीपीसीच्या पहिल्या युनिटमधून वीजनिर्मिती सुरू आहे़ प्रकल्पाच्या सद्यस्थितीचा आढावा घेताना सिन्हा यांनी एनटीपीसीमुळे तापमानात वाढ होण्याच्या कथित चर्चेला छेद दिला़ ते म्हणाले, उजनी जलाशयातून एनटीपीसीसाठी पाणीसाठा करण्यात आला आहे़ त्यामुळे परिसरात पाण्याची पातळी वाढली असून, चोहो बाजूंनी हिरवळ आणि पिके वाढली आहेत़ प्रकल्पस्थळी १ लाख ३२ हजार वृक्षांची लागवड करण्यात आली आहे़ या स्थितीमुळे तापमानात निश्चित घट होणार आहे़ रामगुंडम येथील प्रकल्पात वृक्षराजीमुळे ३ अंशाने तापमान घटल्याचा अनुभव त्यांनी सांगितला़ यावेळी बोलताना खा़ बनसोडे यांनी एनटीपीसीच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त केले़ प्रकल्पाचा दुसरा टप्पा मे २०१९ मध्ये कार्यान्वित होणार आहे़ या प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाचारण करणार असल्याची माहिती त्यांनी दिली़ याप्रसंगी एनटीपीसीचे वरिष्ठ अधिकारी डी़ पॉल, एस़ के़ सत्या, हेमंत शिंदे, टी़ प्रेमदास आदी उपस्थित होते़
सोलापूरच्या एनटीपीसीमुळे २ अंशाने तापमान घटण्याचा प्रशासनाचा दावा, खा़ शरद बनसोडे यांनी घेतला आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 16:26 IST
फताटेवाडी येथील एनटीपीसीमुळे सोलापूरच्या तापमानात कसलीही वाढ होणार नाही़ याउलट परिसरातील उपाययोजनांमुळे २ अंशाने तापमानाची घट होईल, असा दावा एनटीपीसीचे महाप्रबंधक नव कुमार सिन्हा यांनी केला आहे़ मात्र, त्यासाठी पाच वर्षे वाट पाहावी लागेल, अशी पुष्टी त्यांनी जोडली़
सोलापूरच्या एनटीपीसीमुळे २ अंशाने तापमान घटण्याचा प्रशासनाचा दावा, खा़ शरद बनसोडे यांनी घेतला आढावा
ठळक मुद्देसोलापूरचे खासदार अॅड़ शरद बनसोडे यांनी आज एनटीपीसी प्रकल्पाला भेट दिली़अॅड़ शरद बनसोडे त्यांच्या हस्ते इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनचा कोनशिला समारंभपर्यावरण अनुकूलतेला प्रोत्साहन देण्यासाठी या चार्जिंग स्टेशनची स्थापना