शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

शाडूचे गणपती घरोघरी; गणरायाची मूर्ती तयार करणाºयांसाठी देणार माती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 12:27 IST

मूर्तिकार शरणबसप्पा कुंभार यांचा पुढाकार : प्लॅस्टर आॅफ पॅरिसचा होतो विपरीत परिणाम

ठळक मुद्देशाडूच्या मूर्ती खरेदीला अलीकडच्या काळात चांगला प्रतिसाद मिळू लागला पीओपीपेक्षा शाडूच्या मूर्ती महाग असल्या तरी अधिक टिकाऊ असतातभविष्य हा शाडूच्या मूर्तींचा आहे. त्यामुळे भविष्यात या मूर्तींच्या किमती कमी होतील

सोलापूर : प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तींचा विपरीत परिणाम मानवी जीवनशैलीवर होतो. हे रोखण्यासाठी तीन पिढ्यांपासून आम्ही शाडू अन् मातीच्या गणेशमूर्ती तयार  करतो. आताच्या पिढीने तर शास्त्रशुद्ध प्रशिक्षणही घेतले आहे, असे सांगतानाच यंदाच्या गणेशोत्सवात अशा मूर्ती कोणी तयार करणार असेल तर आम्ही माती उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही नीलम नगर येथील प्रसिद्ध मूर्तिकार शरणबसप्पा कुंभार यांनी दिली.

कोरोना काळात येणाºया यंदाच्या गणेशोत्सवातसोलापूरकरांना संसर्गापासून अधिकाधिक सुरक्षित ठेवण्यासाठी ‘लोकमत’ने ‘शाडूच्या मूर्ती घरोघरी’ ही मोहीम हाती घेतली आहे. त्या पार्श्वभूमीवर मूर्तिकार कुंभार यांच्याशी संवाद साधला.

यंदा कुंभार परिवाराने तीन हजारांहून अधिक शाडूच्या गणेशमूर्ती बनवल्या आहेत. पन्नास वर्षांहून अधिक काळापासून कुंभार परिवार मातीच्या गणेशमूर्ती तयार करत आहे. यंदा त्यांनी आॅरेंज कलरच्या गणेशमूर्ती बनवल्या आहेत. गणरायाचं किरीट तेही सोनेरी आहे. ब्लॅक अँड व्हाईट रंगांनी डोळे बोलके बनले आहेत. सर्व मूर्ती सुंदर, सुबक आणि आकर्षक आहेत. प्लॅस्टर आॅफ पॅरिसपेक्षा अधिक पटीने या मूर्तींमध्ये सुंदरता असल्याचे दिसून आले.

शाडू गणेशमूर्तीचे वैशिष्ट्य

  • घरातच विसर्जन करता येते.
  • पाण्यात लवकर विरघळतात.
  • पाणी आणि जमिनीचे प्रदूषण होत नाही.
  • मातीचा पुनर्वापर करता येईल.
  • पीओपीपेक्षा अधिक मजबूत.
  • मूर्तीत अधिक सुंदरता येते.

शाडूच्या मूर्ती खरेदीला अलीकडच्या काळात चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. पीओपीपेक्षा शाडूच्या मूर्ती महाग असल्या तरी अधिक टिकाऊ असतात. भविष्य हा शाडूच्या मूर्तींचा आहे. त्यामुळे भविष्यात या मूर्तींच्या किमती कमी होतील. पर्यावरणाचीही हानी होणार नाही. सोलापुरात कोणी शाडूच्या मूर्ती बनवायला तयार असतील तर त्यांना मी माती उपलब्ध करून देणार आहे.- शरणबसप्पा कुंभार, गणेश मूर्तिकार

टॅग्स :SolapurसोलापूरGanesh Mahotsavगणेशोत्सव