शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्ह्यातील उद्योग, व्यवसायाची होणार सातवी आर्थिक गणना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 12:40 IST

आॅगस्टपासून सुरूवात: गावांमधील सुविधा केंद्रावर जबाबदारी

ठळक मुद्देसातव्या आर्थिक गणनेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठकजिल्हा सांख्यिकी अधिकारी सी. व्ही. गोडसे यांनी आर्थिक गणना करण्यापाठीमागील उद्देश सांगितलाशहर व जिल्ह्यात असलेले उद्योग व व्यवसायाची माहिती घेतली जाणार

सोलापूर : केंद्र सरकारतर्फे सुरू करण्यात आलेल्या सातव्या आर्थिक गणनेस सोलापूर जिल्ह्यात सुरूवात केली जाणार आहे. या गणनेसाठी प्रगणकांना नागरिकांनी अचूक माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी ‘लोकमत’ शी बोलताना केले.

सातव्या आर्थिक गणनेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीला जिल्हा परिषद, सोलापूर महानगरपालिका, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, राष्ट्रीय नमुना पाहणी संघटना, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठाचे संख्याशास्त्र आणि अर्थशास्त्र विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

जिल्हा सांख्यिकी अधिकारी सी. व्ही. गोडसे यांनी आर्थिक गणना करण्यापाठीमागील उद्देश सांगितला. या गणनेत शहर व जिल्ह्यात असलेले उद्योग व व्यवसायाची माहिती घेतली जाणार आहे. शहर व ग्रामीण भागात असणारे मोठे उद्योग, कंपन्या, दुकाने, व्यवसाय यांची माहिती नोंदविण्यात येणार आहे. याची जबाबदारी गावांमध्ये नेमण्यात आलेल्या सुविधा केंद्रावर देण्यात आली आहे. आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून प्रत्यक्ष कामास सुरूवात होणार आहे. 

या आर्थिक गणनेतून जिल्ह्यातील उद्योग व व्यवसायाची माहिती सरकारला कळणार आहे. यात कोणत्या उद्योग व व्यवसायात किती कामगार कार्यरत आहेत हे स्पष्ट होणार असल्याने सरकारला धोरण ठरविणे सोपे होणार असल्याचे गोडसे यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी आर्थिक गणनेसाठी प्रगणक आणि पर्यवेक्षकांची नियुक्ती करा. गणना करणाºया प्रगणकांना योग्य प्रकारे प्रशिक्षण देण्यात यावे व या कामासाठी गरज पडल्यास सुशिक्षित बेरोजगारांची मदत घेण्यात यावी, अशा सूचना केल्या. 

आर्थिक धोरणास उपयुक्त- दर पाच वर्षानी आर्थिक गणना केली जाते अशी माहिती जिल्हा सांख्यिकी अधिकारी गोडसे यांनी दिली. यापूर्वी २0१३ मध्ये सहावी आर्थिक गणना झाली होती. या गणनेतून जिल्ह्यात कोणते उद्योग, व्यवसाय आहेत व त्यातून कोणते उत्पादन होते याची माहिती मिळते. त्यावरून सरकारला आर्थिक धोरण ठरविताना मदत होते. मोबाईल अ‍ॅपवर हे सर्वेक्षण होणार आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयbusinessव्यवसाय