शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
4
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
5
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
6
७ वर्षांनंतर अनुष्का शर्मा करणार कमबॅक! 'चकदा एक्सप्रेस' OTTवर होणार रिलीज?
7
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
8
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
9
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
10
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
11
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
12
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
13
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 
14
'ती' फाइल आधी ३ वेळा माझ्याकडे आली होती; मी ती नाकारली- माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
15
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
16
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
17
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
18
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
19
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
20
अजितदादांना शह देण्यासाठी पार्थ पवार प्रकरण काढलं गेलं का?; चंद्रकांत पाटील म्हणाले...

सात हजार रेल्वे प्रवाशांनी केला विनामास्क प्रवास; १२ लाख ७२ हजाराचा दंड वसूल

By appasaheb.patil | Updated: June 3, 2021 16:31 IST

१२ लाख ७२ हजाराचा दंड वसूल - स्थानक अन् रेल्वेत थुंकणार्यांकडूनही वसूल केला दंड

सोलापूर - कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी मध्य रेल्वेनेरेल्वे परिसरात आणि रेल्वे प्रवासात मास्क घालणे बंधनकारक केले आहे. मास्क न घालणार्यांकडून प्रत्येक व्यक्तींना ५०० रूपये दंड केला जात होता. मध्य रेल्वे विभागाने ५० दिवसात मास्क न घालणार्या ७ हजार १४३ जणांवर कारवाई करून १२ लाख ७२ हजार ८२५ रूपयांचा दंड वसूल केला आहे.

रेल्वे परिसरात किंवा रेल्वेत विनामास्क प्रवासी आढळून आल्यास अथवा कुठेही थुंकण्यामुळे रेल्वे परिसरात अस्वच्छता पसरेल. त्यामुळे नागरिकांना विविध आजारांची लागण होऊ शकते. कोरोना काळात अस्वच्छता पसरविल्यास कोरोनाचा संसर्गही होऊ शकतो. त्यामुळे मध्य रेल्वेने १७ एप्रिल रोजी मास्क न घालणार्याविरोधात दंडात्मक कारवाईचे आदेश जारी केले. त्यानंतर १७ एप्रिल ते ते २ जूनपर्यंत मास्क न घालणार्याविरोधात कारवाई केली. रेल्वे परिसर अथवा रेल्वेत असताना विनामास्क सापडल्यास ५०० रुपयांचा दंड ठोठविण्यात आला आहे. त्याचबरोबर रेल्वे स्थानक परिसर अथवा रेल्वेत थुंकून परिसर अस्वच्छ केल्यासही ५०० रुपये दंड वसूल करण्यात येत आहे. मध्य रेल्वे प्रशासनाच्या रेल्वे कर्मचाऱ्यांनी विना मास्क घातलेल्या प्रवाशांकडून दंड वसूली केली आहे.

विभागनिहाय कारवाई आणि दंडाची रक्कम

विभाग             केसेस             दंडाची रक्कम

  • मुंबई विभाग - १२६९ - २ लाख ४० हजार ६४५
  • भुसावळ - २९२८ - ३ लाख ५४ हजार १५०
  • नागपूर - १९५३ - ४ लाख २ हजार ३००
  • पुणे - ५२५ - १ लाख ६९ हजार ९८०
  • सोलापूर - ४६८ - १ लाख ५ हजार ७५०
  • एकूण - ७१४३ - १२ लाख ७२ हजार ८२५

 

कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून केंद्र व राज्य शासनाने दिलेल्या सर्व नियमांचे व प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा पालन करण्यात येत आहे. मास्क न घातलेल्यांवर कारवाईची मोहिम सुरू आहे. कोरोना संपेपर्यंत ही मोहिम अशीच सुरू राहणार आहे. प्रवाशांनी कोरोना नियमांचे पालन करून सहकार्य करावे.

- शिवाजी सुतार, रेल्वे अधिकारी, मध्य रेल्वे विभाग.

टॅग्स :Solapurसोलापूरcentral railwayमध्य रेल्वेrailwayरेल्वेcorona virusकोरोना वायरस बातम्या