शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

व्हील चेअरवरुन ‘तो’ हाकतो तब्बल सात उंटांचा काफिला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 12:41 IST

सोलापूरच्या खरातांचा अनोखा व्यवसाय; चिमुकल्यांना उंटावर बसवून चार पैसे मिळविण्यासाठी भटकंती

ठळक मुद्देराजस्थानच्या वाळवंटात दिसणारे काही उंट आता सोलापुरातील बालचिमुकल्यांचे आकर्षणबालचिमुकल्यांसाठी असलेले हे आकर्षण काहींना उंटावरील स्वारीचा व्यवसाय मिळवून दिलामाढा तालुक्यातील टेंभुर्णीनजीक असलेल्या माळेगावातील चार कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून सोलापुरात स्थिरावले

मिलिंद राऊळ

सोलापूर : उंटावर स्वार होणं... त्यावर एक फेरफटका मारताना शरीराची विशिष्ट हालचाल होताना चिमुकल्यांचा आनंद गगनात मावेनासा होतो. हाच आनंद घेऊन चार कुटुंबांचा प्रमुख असलेला अपंग व्यावसायिक आपल्या व्हील चेअरवरुन तब्बल सात उंटांचा प्रवास करताना संसाराचा गाडा हाकताना दिसतो आहे. मोकळी मैदानं हीच आपली घरं.. एका ठिकाणाहून दुसºया ठिकाणी घराचंही स्थलांतरही होताना भटकंतीने त्यांची पाठ सोडलेली नाही. 

राजस्थानच्या वाळवंटात दिसणारे काही उंट आता सोलापुरातील बालचिमुकल्यांचे आकर्षण बनले आहेत. बालचिमुकल्यांसाठी असलेले हे आकर्षण काहींना उंटावरील स्वारीचा व्यवसाय मिळवून दिला. माढा तालुक्यातील टेंभुर्णीनजीक असलेल्या माळेगावातील चार कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून सोलापुरात स्थिरावले आहेत. 

या कुटुंबाचे दौलत मनोहर खरात हे तसे अपंग. २० वर्षांपूर्वी लकवा मारल्याने त्यांचे दोन्ही पाय निकामी झाले. असे असतानाही आजही व्हील चेअरचा (अपंगासाठी असलेली तीन चाकी सायकल) आधार घेत दौलत सकाळी ७ वाजताच झोपडीबाहेर पडतात. आज कुठे जायचं अन् कुठल्या भागातील चिमुकल्यांना उंटाची स्वारी घडवायची, याचा जणू आदेश दौलतराव देत असतात. तेथून सातही उंटाचे मालक ज्या-त्या कॉलनीत, नगरांमध्ये जातात. 

कधी-कधी मोठमोठ्या अपार्टमेंटसमोर थांबून चिमुकल्यांना उंटाची स्वारी घडवून आणतात. ८ ते १० मिनिटाच्या स्वारीसाठी १० रुपये मिळतात. कधी-कधी एकाच घरातील तीन-चार चिमुकल्यांना एकत्र स्वारी घडवून आणताना जादा पैसेही मिळतात. उच्चभ्रू अथवा मध्यमवर्गीय वसाहतीत हे उंट फिरवताना चार अधिक पैसे मिळतील, अशी आशाही ही मंडळी बाळगून असतात. 

पाण्यासाठी मिठाचे समीकरण- राजस्थानातील उंट विक्रीसाठी नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील माळेगाव (घोडा) येथे येतात. एका उंटाची किंमत ७० ते ८० हजार रुपयांच्या घरात असते. या उंटांना सोलापुरात आणले तर इथल्या वातावरणात ते पाणी पित नाहीत. पाणी पिले नाही तर त्यांचे आयुष्य कमी होते. त्यांचे आयुष्य वाढावे म्हणून त्यांना हरभºयाबरोबर मीठही दिले जाते. मीठ खाल्ल्याने त्यांना तहान लागते, म्हणून मीठ खाऊ घालण्याची पद्धत असल्याचे दौलत मनोहर खरात यांनी सांगितले. 

एका उंटाचा दररोजचा खर्च दीडशे रुपये- सकाळी ७ ते रात्री ९ पर्यंत म्हणजे १४ तास ही मंडळी दारोदारी जातात. दिवसभरात कधी ४०० तर कधी ६०० रुपये मिळतात. रविवारी आणि सुटीदिवशी हजार रुपयेही मिळतात. त्यातून उंटाला लागणारा चारा, हरभºयासाठी दररोज १५० रुपये खर्च करावे लागत असल्याचे अजित दौलत खरात यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. 

शाही मिरवणुकीत उंटाचा मानच न्यारा- सोलापूर शहर हे उत्सवप्रिय शहर आहे. विविध जयंत्या, यात्रा, लग्न समारंभातील शाही मिरवणुकीत उंटांना चांगलाच मान असतो. हौशी सोलापूरकर मंडळींमुळे कधी दोन तर कधी चार उंटाच्या जोड्यांना मागणी असते. त्यातून एक हजार रुपयांपासून ५ हजार रुपये मिळत असल्याचेही दौलत खरात यांनी सांगितले. 

टॅग्स :Solapurसोलापूरbusinessव्यवसाय