शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटक, केरळी युवकांच्या भावना; कोरोना गेल्यानंतर सोलापुरात पुन्हा कामाला येऊ...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 12:16 IST

चिंता रोजगाराची : सध्या काम नसल्याने थांबणे अशक्य असल्याचेही व्यक्त केले मत

ठळक मुद्देकोरोना आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून भारतात लॉकडाउन करण्यात आलेकोरोना आजार गेल्यानंतर सोलापुरात कामासाठी पुन्हा येणार असल्याचा विश्वास या तरुणांनी बोलून दाखविलाशहरामध्ये एका शेतीसंबंधित कंपनीमध्ये मार्केटिंंगचे काम करणारे काही तरुण व तरुणी मागील दोन वर्षांपासून राहतात

सोलापूर : आम्ही मागील दोन वर्षांपासून सोलापुरात काम करत आहोत. इतके दिवस आम्हाला कसलाही त्रास झाला नव्हता. कोरोना आजारामुळे अडचणी आल्या. आता इथे काम नसल्याने थांबणे अशक्य झाले आहे. गावाकडे कधी पोहोचू माहिती नाही. पण कोरोना गेल्यानंतर सोलापुरात पुन्हा कामाला येऊ, असा विश्वास कर्नाटककेरळमधील तरुणांनी बोलून दाखविला.

शहरामध्ये एका शेतीसंबंधित कंपनीमध्ये मार्केटिंंगचे काम करणारे काही तरुण व तरुणी मागील दोन वर्षांपासून राहतात. त्यांच्या वस्तूंचे मार्के टिंग करतात. मिळालेल्या पैशातून आपला खर्च भागवत काही पैसे घरी पाठवतात. असे सुमारे २० तरुण सोलापूर सोडून त्यांच्या मूळ गावी जात आहेत. त्यातील काही तरुण हे म्हैसूर, उडुपी, विजयपूर तसेच केरळ येथील कासरगोड जिल्ह्यातील आहेत. यातील काही तरुण हे दोन वर्षे तर काही जण हे सहा महिन्यांपासून सोलापुरात मार्केटिंगचे काम करतात. सैफुल परिसरात त्यांची कंपनी असून, याच परिसरात ते वास्तव्यास होते.

सध्या काम नसल्याने इथे थांबून काही उपयोग नाही. शासकीय रुग्णालयात कोणताही आजार नसल्याचे तपासणी केल्यानंतर स्पष्ट झाले आहे. सिव्हिल हॉस्पिटल ते सैफुलपर्यंत चालत आलो आहे. आता आम्हाला इथूून आमच्या गावी जायचे आहे. वाहन मिळेल की नाही, घरी कधी पोहोचू माहिती नाही. पण कोरोना आजार गेल्यानंतर सोलापुरात कामासाठी पुन्हा येणार असल्याचा विश्वास या तरुणांनी बोलून दाखविला.

खाण्याची पद्धत वेगळीकोरोना आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून भारतात लॉकडाउन करण्यात आले, तेव्हापासून ते त्यांच्या घरीच होते. त्यांच्या खाण्याची पूर्ण सोय प्रशासनाने केली असल्याचे या तरुणांनी सांगितले. सोलापुरातील प्रशासनाने आमची चांगली सोय केली. जेवणही वेळेवर मिळत होते. पण, आमची खाण्याची पद्धत वेगळी असल्याने पोट भरून खाऊ शकत नव्हतो. 

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसKarnatakकर्नाटकKeralaकेरळjobनोकरी