शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

करमाळ्यातील राष्ट्रवादीचे बागल घेणार हाती सेनेचे धनुष्यबाण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 19:34 IST

राष्ट्रवादी काँग्रेस च्या प्रदेश कार्यकारिणी सदस्या व युवा नेत्या रश्मी बागल राष्ट्रवादी सोडुन शिवसेनेत प्रवेश करणार

करमाळा : तेरा वर्ष झाले कुठ पर्यंत सहन करायचे...आता सहनशीलतेचा अंत झालाय,संजयमामांना लोकसभा निवडणुकित पक्षाने आदेश देताच साथ दिली पण आता विधानसभेला पुन्हा संजयमामा उभे राहण्याची तयारी करू लागलेत मग पक्षाचे आता ते ऐकत नाहीत का? सातत्याने आमच्यावर अन्याय होत असल्याने हातात धनुष्यबाण घेणार आहोत असे बागल गटाचे युवा नेते व रश्मी बागल यांचे बंधू दिग्विजय बागल यांनी  रश्मी बागल यांच्या सेना प्रवेशाबद्धल विचारना केली असता स्पष्ट शब्दात सांगितले. 

राष्ट्रवादी काँग्रेस च्या प्रदेश कार्यकारिणी सदस्या व युवा नेत्या रश्मी बागल राष्ट्रवादी सोडुन शिवसेनेत प्रवेश करणार असुन सोमवारी सकाळी १० वा. समर्थकांची त्यांच्या करमाळयातील निवासस्थानी बैठक बोलावली आहे.

    राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये अंतर्गेत बंडाळी व नियमित हितशत्रूचा विरोध पत्करावा लागत असल्याने बागल गटाचे समर्थक राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराज असुन आगामी विधानसभानिवडणूक राष्ट्रवादी कडून न लढवता शिवसेने कडून लढवावी अशी मागणी होत होती.-------------------------------मंत्री सावंत यांचा अशिर्वाद..येत्या सोमवारी कार्यकर्त्यांची बैठक झाल्यानंतर  शिवसेनेत पक्ष प्रवेश होईल असे दिग्विजय यांनी सांगुन शिवसेना जिल्हा  संपर्क नेते व जलसंधारण मंत्री प्रा.तानाजी सावंत यांचा अशिर्वाद असल्याची कबुली देत पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी पक्ष उमेदवारी देणार असल्याचा शब्द दिल्याचे  दिग्विजय बागल यांनी सांगितले.

टॅग्स :Solapurसोलापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकkarmala-acकर्मलाmadha-acमाधा