शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

नव्या नियमानुसार बाजार समित्यांच्या निवडणुका घ्या़....सहकार खात्याचे आदेश, याद्या तयार करण्याचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 11:56 IST

नव्या कायद्यानुसार होणाºया बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी निवडणूक अधिकारी असतील तसेच निवडणुकीसाठी पात्र असलेल्या बाजार समित्यांच्या कार्यक्षेत्रातील गावांच्या याद्या मागविण्याचे आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने जिल्हा उपनिबंधकांना दिले आहेत.

ठळक मुद्देबाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी निवडणूक अधिकारीसोलापूर व बार्शी बाजार समिती सचिवांना कार्यक्षेत्रातील गावांच्या याद्या तयार करण्याचे आदेशबाजार समित्यांच्या सचिवांनी कार्यक्षेत्रातील गावांच्या याद्या जिल्हा उपनिबंधकांना सादर करावयाच्या आहेत

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २०: नव्या कायद्यानुसार होणाºया बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी निवडणूक अधिकारी असतील तसेच निवडणुकीसाठी पात्र असलेल्या बाजार समित्यांच्या कार्यक्षेत्रातील गावांच्या याद्या मागविण्याचे आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने जिल्हा उपनिबंधकांना दिले आहेत.राज्यातील भाजपा सरकारने बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी शेतकºयांना मतदानाचा अधिकार दिला असून, त्यासाठीची नियमावली निश्चित झाली आहे. शेतकºयांना मतदानाच्या नियमावलीसाठी सहकार खात्याकडे २० हरकती आल्या होत्या. त्या हरकती विचारात घेऊन शासनाने निवडणुकीसाठी पात्र असलेल्या बाजार समित्यांच्या कार्यक्षेत्रातील गावांची यादी करण्याचे आदेश दिले आहेत. शासनाने आता सरसकट सर्वच बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी निवडणूक अधिकारी असतील, हे स्पष्ट केले आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने जिल्हा उपनिबंधकांना दिलेल्या पत्रात काही बाजार समित्यांच्या निवडणुकांची प्रकरणे उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट झाल्याने उच्च न्यायालयाने विशिष्ट दिनांकापर्यंत निवडणुका पूर्ण करण्याचे आदेश केल्याने निवडणुकीची पूर्वतयारी करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. जुन्या नियमानुसार पाच कोटींपेक्षा अधिक उलाढाल असलेल्या बाजार समित्यांची निवडणूक जिल्हाधिकारी नियुक्त करतील त्या महसूल खात्याचे अधिकारी तर लहान बाजार समित्यांच्या निवडणुका जिल्हा उपनिबंधक घेत होते. नव्या नियमानुसार सर्वच बाजार समित्यांच्या निवडणुका पार पाडण्याची जबाबदारी जिल्हाधिकाºयांवर आहे. -------------------याद्या करण्याचे काम सुरू- बाजार समित्यांच्या सचिवांनी कार्यक्षेत्रातील गावांच्या याद्या जिल्हा उपनिबंधकांना सादर करावयाच्या आहेत. - बाजार समित्यांच्या सचिवांकडून आलेल्या गावांच्या याद्या जिल्हाधिकाºयांना सादर करावयाच्या असून, जिल्हाधिकारी त्या- त्या गावातील शेतकºयांची यादी गणनिहाय तयार करुन घेणार आहेत.- या याद्यांनुसार बाजार समिती क्षेत्राचे १५ गणांमध्ये विभाजन केल्यानंतर त्यापैकी पाच गण लॉटरी पद्धतीने(महिलांसाठी-२, इतर मागास, विमुक्त जाती-भटक्या जमाती व अनुसूचित जाती-जमाती प्रत्येकी एक असे एकूण पाच) आरक्षित करतील.- गणांची आरक्षण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शेतकºयांची गणनिहाय यादी तयार करण्याची जबाबदारी बाजार समितीवर सोपवतील.- यादीत समावेश होणाºया शेतकºयाला किमान १० आर जमीन असणे आवश्यक आहे तसेच त्याचे वय डिसेंबर १७ रोजी १८ वर्षे पूर्ण असावे.- बाजार समितीचे सचिव जिल्हाधिकाºयांकडून आलेली शेतकºयांची यादी नियमानुसार तयार करुन शिवाय हमाल व मापाड्यांची यादी जिल्हाधिकाºयांना सादर करतील. --------------------सोलापूर, बार्शी सचिवांना आदेश - सोलापूर जिल्ह्यातील करमाळा बाजार समितीची मुदत २१ फेब्रुवारी २०१८, बार्शी बाजार समिती प्रशासकाची मुदत ११ मार्च १८ तसेच सोलापूर बाजार समिती प्रशासकाची मुदत १६ एप्रिल १८ रोजी संपणार आहे. सोलापूर जिल्हा उपनिबंधकांनी सोलापूर व बार्शी बाजार समिती सचिवांना कार्यक्षेत्रातील गावांच्या याद्या तयार करण्याचे आदेश दिले असल्याचे सांगण्यात आले. 

टॅग्स :SolapurसोलापूरElectionनिवडणूक