शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरातील २५ साखर कारखान्यांवर जप्ती, कारवाईचा प्रस्ताव; शेतकऱ्यांचे ५७७ काेटी रुपये थकले

By राकेश कदम | Updated: April 5, 2023 19:17 IST

रयत क्रांतीचे आंदाेलन; प्रादेशिक सहसंचालकांनी आयुक्तांना पाठविले पत्र

राकेश कदम

सोलापूर :जिल्ह्यातील २५ कारखान्यांकडे उस बिलाची ५७७ काेटी रुपये एफआरपी थकीत आहे. या कारखान्यांवर महसूल वसुली प्रमाणपत्र (आरआरसी) नुसार कारवाई करणे आवश्यक असल्याचे पत्र प्रादेशिक सहसंचालक (साखर) राजेंद्रकुमार दराडे यांनी बुधवारी साखर आयुक्तांना पाठविले. गेल्या चार महिन्यात पाठविलेले हे चाैथे पत्र आहे. एकाही पत्रावर कार्यवाही झाली नसल्याचे शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी सांगितले. 

जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम संपला. अजूनही अनेक कारखान्यांनी एफआरपी (रास्त व किफायतशीर दर) दिलेला नाही. या कारखान्यांवर कारवाई करावी या मागणी रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी प्रादेशिक सहसंचालकांच्या कार्यालयासमाेर निदर्शने केली. यावेळी रयत क्रांती संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष दीपक भाेसले, हणुमंत गिरी, समाधान फाटे, छगन पवार, नामदेव पवार, तनुजा जवळे, बाळासाहेब बाेबडे, लक्ष्मण बिराजदार, नागेश नाईकवाडे, रमेश भंगे, राजकुमार बिराजदार, सुनिता चव्हाण, प्रियंका दाेडांळे, वेष्णवी लाेहार, श्रीदेवी रेड्डी, रेणुका लाेहार आदी उपस्थित हाेते. या आंदाेलनानंतर प्रादेशिक सहसंचालकांनी २५ कारखान्यांवर आरआरसीची कारवाई करण्यात यावी, असे पत्र पाठविले. रयत क्रांती संघटनेच्या आंदाेलनामुळे प्रादेशिक सहसंचालकांनी कारवाईचा प्रस्ताव ठेवला. साखर आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात प्रस्ताव तयार करुन कारखान्यांवर कारवाई केली पाहिजे. अन्यथा साखर आयुक्तालयासमाेर आंदाेलन सुरू हाेईल. अधिकाऱ्यांनी कागदपत्रे नाचविण्याचा फार्स करू नये.- दीपक भाेसले, कार्याध्यक्ष, रयत क्रांती संघटना. 

या साखर कारखान्यांकडे थकलेली एफआरपी

मकाई  - २६ काेटी, कुर्मदास - ११ काेटी, लाेकनेते - २, सासवड माळी शुगर्स - २२ काेटी, लाेकमंगल दारफळ -४ काेटी, लाेकमंगल भंडारकवठे - २ काेटी, सिध्दनाथ - ४९ काेटी, जकराया - १४ काेटी, इंद्रेश्वर शुगर्स - १६ काेटी, भैरवनाथ शुगर्स विहाळ - २९ काेटी, भैरवनाथ शुगर्स लवंगी - ३१ काेटी, युटाेपियन शुगर्स - २० काेटी, माताेश्री - २४ काेटी, भैरवनाथ शुगर्स आलेगाव - ३७ काेटी, बबनराव शिंदे शुगर्स - ४ काेटी, जय हिंद शुगर्स - १२ काेटी, विठ्ठल शुगर्स करमाळा - ८३ काेटी, आष्टी शुगर्स - १७ काेटी, भीमा सहकारी - ५२ काेटी, सहकार शिराेमणी भाळवणी -४४ काेटी, सीताराम महाराज खर्डी - ९ काेटी, सांगेाला सहकारी - १२ काेटी, शंकर सहकारी - २३ काेटी, आवताडे शुगर्स - १४ काेटी, येडेश्वर - ३ काेटी, सिध्देश्वर ३४ काेटी.(साखर आयुक्ताकडील माहितीनुसार)

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखाने