शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पहा सोलापुरात आहे कोणतीही सुविधा नसलेले मतदान केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 16:45 IST

सोलापूर शहरातील कुष्ठरोग वसाहतीतील दवाखान्यात असलेल्या मतदान केंद्रात कोणत्याच सुविधा नसल्याने कर्मचारी हैराण झाले.

ठळक मुद्देकुमठानाका येथील कुष्ठरोग वसाहतीतील दवाखान्यातील मतदान केंद्रात दोन बुथ (बुथ क्र. २४२ व २४३ ठेवण्यात आले मतदान केंद्राध्यक्षासह कर्मचारी दाखल झाले पण या ठिकाणी असलेल्या दोन आठ बाय दहाच्या खोलीत काहीच सुविधा उपलब्ध नसल्याने पाहून ते हैराण झाले

सोलापूर : शहरातील कुष्ठरोग वसाहतीतील दवाखान्यात असलेल्या मतदान केंद्रात कोणत्याच सुविधा नसल्याने कर्मचारी हैराण झाले. कर्मचाºयांच्या मदतीतीला परिसरातील नागरिक धावून आल्याने वीज व पाण्याची सोय झाली.

कुमठानाका येथील कुष्ठरोग वसाहतीतील दवाखान्यातील मतदान केंद्रात दोन बुथ (बुथ क्र. २४२ व २४३ ठेवण्यात आले आहेत. बुधवारी या केंद्रासाठी मतदान केंद्राध्यक्षासह कर्मचारी दाखल झाले पण या ठिकाणी असलेल्या दोन आठ बाय दहाच्या खोलीत काहीच सुविधा उपलब्ध नसल्याने पाहून ते हैराण झाले.

ना वीज व ना पाणी रात्र कशी काढायची असा त्यांच्यासमोर प्रश्न उभा ठाकला. त्यांच्या मदतीला लेप्रेसी मदत संस्थेचे अध्यक्ष अंबादास नडगिरी धावून आले. त्यांनी महापालिकेच्या अधिकाºयांशी संपर्क साधून वीजेची सोय केली. तसेच पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिले. सकाळी उठल्यावर कर्मचाºयांना स्नानासाठी पाणी उपलब्ध झाले नाही. स्वच्छतागृह नसल्याने महिला कर्मचाºयांची कुचंबणा झाली. 

दोन्ही बुथ आठ बाय दहाच्या खोलीत कसेबसे मांडण्यात आले. टेबलाला टेबल खेटून कर्मचारी दाटीने बसले. मतदान कक्षालाही पुरेशी जागा उपलब्ध झाली नाही. विशेष म्हणजे कुष्ठरोगी बांधवांचे १0५0 इतके मतदान असताना ना व्हीलचेअर, ना वैद्यकीय सुविधा उपलब्ध केल्या गेल्या. कुष्ठरोगी मतदानांसाठी खबरदारी म्हणून मतदान कर्मचाºयांना हॅन्डग्लोज पुरविण्यात येतात. पण यावेळेस अशी कोणतीच खबरदारी घेतली नसल्याचे दिसून आले. या मतदान केंद्रावर सकाळी मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. आमदार प्रणिती शिंदे यांनी दोनवेळा या मतदान केंद्रास भेट दिली. ----------असे केंद्र पाहिले नाहीमतदान केंद्र अधिकारी मुक्तेश्वर मुळे म्हणाले मी ३0 वर्षे मतदान कें्रदाची सेवा केली पण आयुष्यात असले केंद्र पाहिले नाही. या मतदान केंद्रावर ना वीज, ना पाण्याची सोय आहे. स्वच्छतागृह नाही, दिव्यांगांना सुविधा नाही. तक्रार नोंदविल्यावर रात्री उशिरा वीज कनेक्शन मिळाले, निम्म्या कर्मचाºयांनी आंघोळ केली नाही. सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी मदत केली ही वस्तुस्थिती आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकsolapur-pcसोलापूरVotingमतदान