शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
3
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
4
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
5
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
6
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
7
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
8
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
9
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
10
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
11
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
12
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
13
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
14
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
15
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
16
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
17
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
18
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
19
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
20
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!

पोशिंदाच दुधाच्या शोधात..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 12:27 IST

कष्टकरी हाच खरा शेतकरी...

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वतयारीमुळे त्या दिवशी शाळेतून घरी परत निघायला उशीर झाला. शाळा सोडून पाच-दहा मिनिटे झाली असतील. दोन-चार कि.मी. ओलांडल्यावर रस्त्यावर डावीकडे चौथीतली राधिका दिसली. ‘सर.. सर..’ म्हणून हाक मारली. आवाजाकडे वळून आम्ही थांबलोच. ती पळतच आली. ‘बाबांनी तुम्हाला वस्तीवर बोलवलंय..’ राधिकाचं बोलावणं ऐकून मी मनातल्या मनात पुटपुटलो, ‘आधीच उशीर झालेलं! आता हे काय पुन्हा नवीन?’ पण नाईलाज होता. कारण छोटी राधिका खूपच आग्रहाने बोलवत होती, त्यामुळे आम्ही तिच्या वस्तीवर पोहोचलो.

वस्तीच्या जवळ गेल्यावर तिथला कुत्रा भुंकू लागला, पण ‘सत्या...’ राधिकाच्या या आवाजाने तो गप्पगार झाला. मी सहज म्हटलं, ‘सत्या तुमचा कुत्रा आहे का?’ ‘हो सर’ राधिका बोलली. आमच्या सहकाºयांनी लगेच दुसरा प्रश्न केला, ‘सत्याला सोडून अजून कोण कोण आहेत?’ राधिका उत्तरली, ‘आई, बाबा, मोठा भाऊ, लहान भाऊ, मंगला, गोदा, सख्या-तुक्या!’ आमच्या सहकाºयांनी अवाक् होऊन विचारले, ‘मंगला, गोदा, सख्या-तुक्या हे काय चुलत्याची मुले आहेत का?’ लगेच सांगू लागली, ‘नाही ओ सर! मंगला आमची म्हैस आहे, गोदा गाय आणि सख्या-तुक्या ही बैलजोडी आहे.’ आम्ही दोघेही आश्चर्यचकीत होऊन तिच्या वस्तीवर पोहोचलो. राधिकाचे वडील वस्तीच्या बाहेरच थांबले होते. त्यांनी हसतमुखाने स्वागत केले. बाजेवर बसून आमच्या गप्पाटप्पा सुरू झाल्या.

राधिका पाण्याचे दोन ग्लास घेऊन आली. पाणी पिऊन झाल्यावर राधिकाचे वडील म्हटले, ‘गुरुजी, रात्र झाली, आता शहरात जायला खूप उशीर होईल. दोन घास खाऊन इथंच आराम करा.’ आमच्या सहकाºयांनी लगेच तोंड उघडले, ‘खूप कामं आहेत जावं लागेल, राहून कसं चालेल?’ आमचा नकार ठरलेला पाहून राधिकाच्या वडिलांनी आग्रह थांबवला. ‘बरं सावकाश जा, घाई करू नका.. अगं स्वयंपाक आपल्यापुरतंच कर. दोन कप चहा वाढव.’ आई चुलीवर चहा ठेवल्याबरोबर राधिका बाहेर आली. बाबांच्या कानात काहीतरी पुटपुटली, बाबांनी हातवारे करत काहीतरी सांगितले, मग राधिका आमच्यासमोरूनच हाकेच्या अंतरावरील दोन-चार वस्तीवर जाऊन आली. पुन्हा बाबांच्या कानात काहीतरी पुटपुटली.

‘बरं, जा आता! आहे तसा घेऊन ये.’ असे नाराजीच्या स्वरात बाबांचे बोलणे ऐकून राधिका आत गेली व एका घंगाळात (जर्मनच्या ताटात) चहाचे तीन वेगवेगळ्या रंगांचे कप घेऊन आली. तिने आधी मलाच चहा दिला. डिकासीन (काळा चहा) पाहून थोडंसं कसंसंच झालं, पण नाईलाज होता. राधिकाच्या घंगाळातील तिसरा कप उचलून बाबा म्हणाले ‘गुरुजी माफी करा बरं का! काळा चहाच द्यावं लागलं आम्हाला. दुधाचं लईच             वांदा झालंय अलीकडं. गोदा दूध देईना झाली महिन्यापासून आणि मंगलाबी सकाळीच दूध देती.    गवळी अप्पा सगळंच दूध घेऊन जातो. शेजाºया-पाजाºयांकडंही दूध नाही, म्हणून माफी असावी. दुधात लिंबू पिळलंय मालकिणीनं, थोडं झणझण होईल.’ आम्ही पूर्ण चहा संपवला, तेव्हा ते डिकासीन (म्हणजे शहरातील लेमन टी) पिऊन सकाळपासूनचा शिणवटाच निघून गेला राव! 

चहा झाल्यावर पुन्हा मी दुधाच्या तुटवड्याचा विषय छेडला. राधिकाच्या बाबांनी सांगितले, ‘इथं प्रत्येकाच्या वस्तीवर दोन-चार जनावरे आहेतच. लिटरमागे एकवीस रुपये देतो आणि दरमहा एक तारखेला एकरकमी देत असल्याने आम्हाला परवडते, बाजाराचा खर्च निघून जातो. त्यामुळे दुधाची अशी पंचाईत होते. ‘पोशिंद्याकडून एकवीस-बावीस रुपये लिटर दूध घेणारे गवळीअप्पा मात्र शहरात पन्नास रुपये लिटर दूध विकतात आणि आपण निमूटपणे विकत घेतो. याहून कहर म्हणजे ज्याच्या घरी दूध उत्पादन होते तो पोशिंदा मात्र कमी दरात दूध देऊन स्वत:च दुधाच्या शोधात फिरतो हेच मनाला पटत नाही.- आनंद घोडके(लेखक शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत.) 

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीMilk Supplyदूध पुरवठाmilkदूध