शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
2
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
3
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
4
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
5
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
6
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
7
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
8
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
9
सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
10
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
11
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
12
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
13
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
14
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
15
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
16
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
17
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्
18
Nashik Dengue News: नाशकात डेंग्यूचा उद्रेक! एका महिन्यात रुग्णांची संख्या तिप्पट, कारण काय?
19
महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश
20
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र

नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर मंगळवेढा जवळ शालेय सहलीची बस पलटी, चार विद्यार्थी जखमी

By appasaheb.patil | Updated: December 26, 2024 18:53 IST

या घटनेमध्ये ३९ विद्यार्थी व ११ शिक्षक २ चालक होते. त्यामधील जखमींना ग्रामीण रुग्णालय मंगळवेढा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्क, मंगळवेढा: नागपूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगाने जाणाऱ्या शाळेच्या सहल बसवरील ताबा सुटल्याने बस पलटी होवून चार विद्यार्थी जखमी झाल्याची घटना मंगळवेढापासून तीन किलोमीटर अंतरावर घडली. श्री गणेश विद्यालय शिवनखेड लातूर माध्यमिक विद्यालयाची शाळेची खाजगी बस कोल्हापूर पर्यटनाला जात असताना पहाटे ३.३०च्या सुमारास चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे खाजगी बसचा अपघात झाला. बस रस्त्याच्या खाली उतरली, दोन वेळा पलटी मारून रस्त्याच्या खाली खड्ड्यात पडली. या घटनेमध्ये ३९ विद्यार्थी व ११ शिक्षक २ चालक होते. त्यामधील जखमींना ग्रामीण रुग्णालय मंगळवेढा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.

श्री गणेश विद्यालय शिवनखेड लातूर या विद्यालयाची माध्यमिक शाळेची सहल लातूर येथील खाजगी बस MH 24 AB 7281 ही ३९ विद्यार्थी व आठ शिक्षक यांना घेऊन रात्री १० वाजता कोल्हापूरकडे निघाली होती. सर्व विद्यार्थी व शिक्षक मोठ्या आनंदाने कोल्हापूरकडे निघाले असताना मंगळवेढा येथील लक्ष्मी मंदिर काळाखडकाच्या जवळ ड्रायव्हरचे गाडीवरचे नियंत्रण सुटल्यामुळे गाडी रस्त्याच्या खाली जाऊन दोन वेळा पलटी झाली.

यामध्ये साखर झोपेमध्ये असणारे विद्यार्थी व शिक्षक यांना दुखापत झाली असून १०८ रूग्णवाहिकेचे डॉ. प्रज्योत पाटील व चालक गौसपाक आतार यांनी तातडीचे सहकार्य केले. १०८ अँम्बुलन्स सांगोला यांनाही जखमींची संख्या जास्त असल्यामुळे मदतीसाठी बोलवण्यात आले. त्यामध्ये डॉ. वैभव जांगळे व चालक दत्ता भोसले त्याचबरोबर हायवे अथोरिटी ऑफ इंडिया यांची अँम्बुलन्स १०३३चे ड्रायव्हर व सुपरवायझर यांनी तातडीची घटनास्थळ गाठून मदत कार्य करून जखमी विद्यार्थी, शिक्षक व दोन चालकांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय मंगळवेढा येथे दाखल करण्यात आले.

वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुलोचना जानकर यांनी तातडीने मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयातील धाव घेऊन जखमींसाठी वैदयकिय यंत्रणा सतर्क ठेवत रात्र पाळीतील आर.बी.एस. के चे वैद्यकीय अधिकारी डॉ प्रवीण माने, आयुष डॉ. निखिल जोशी, आर.बी. एस. के चे डॉ कुलकर्णी व परिचारिका वैशाली शिंदे, शितल कपाटे, सानिका गायकवाड सुनिता जाधव व चनशेट्टी यांनी सर्व विद्यार्थ्यांवर उपचार केले. जखमी विद्यार्थी व शिक्षक यांची यांना उपचार केले असून त्यामध्ये दोन विद्यार्थी चालक यांना हाडाची दुखापत झाल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ सुलोचना जानकर यांनी दिली.

टॅग्स :AccidentअपघातStudentविद्यार्थीSchoolशाळा