शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

सोलापूर गारमेंट उद्योगाला बसला शाळा बंदचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:58 IST

कोट्यवधींची उलाढाल ठप्प, २० हजार कामगारांवर कुऱ्हाड

सोलापूर : कोरोनामुळे मागील वर्षभरापासून प्राथमिक आणि माध्यमिक शाळा बंद आहेत. याचा सर्वाधिक फटका सोलापुरातील गारमेंट उद्योजकांना बसतोय. शाळा बंद असल्याने मागच्या वर्षी ५० टक्के गारमेंट कारखाने बंद पडले होते. चालू वर्षातदेखील शाळा सुरू होण्याची चिन्हे दिसेनात. त्यामुळे देशभरातून गणवेशासाठी येणाऱ्या ऑर्डर बंद झाल्या आहेत. येत्या काही दिवसांत उर्वरित ५० टक्के कारखाने बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.शाळा सुरू न झाल्यास सोलापूर गारमेंट उद्योगाची वाटचाल शून्य मार्केटकडे निश्चित असणार आहे. यामुळे गारमेंट उद्योगातील २० हजार कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळेल, अशी माहिती सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चर असोसिएशनचे सहसचिव प्रकाश पवार यांनी ‘लोकमत’ला दिली.कोरोना आणि लॉकडाऊनमुळे येथील गारमेंट उद्योजक मार्केटिंगसाठी मागील वर्षभरापासून बाहेर पडलाच नाही. त्यामुळे नवीन ऑर्डर्स त्यांच्या हाती नाहीत. शाळा सुरू होतील, या आशेवर काही गारमेंट उद्योजकांनी तयार करून ठेवलेले शालेय गणवेश पडून आहेत. त्यामुळे गुंतवणुकीकरिता भांडवल नाही, नवीन ऑर्डर्स नाहीत अशी अवस्था येथील लघु उद्योजकांची आहे. मागील वर्षी जवळपास १५० गारमेंट्स युनिट बंद राहिले. सध्या १०० ते १५० युनिट सुरू आहेत. यातील ५० युनिट्स कधीही बंद पडू शकतात, अशी स्थिती आहे.गणवेश सीझन संपुष्टातमहाराष्ट्र पुन्हा एकदा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरतोय. त्यामुळे बाहेरचा व्यापारी महाराष्ट्रात येत नाही. दुसरी बाब म्हणजे परप्रांतात जाण्याकरिता जाचक अटी आहेत. त्यामुळे सोलापुरातला व्यापारीही बाहेर जाणे शक्य नाही. यंदाही हंगाम चालेल याची शाश्वती नाही. त्यामुळे सलग दोन वर्षे व्यवसाय ठप्प असल्याने उद्योजक आर्थिक खाईत सापडले आहेत.- प्रकाश पवार, सहसचिव, सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चर असोसिएशनआकडे बोलतातनोंदणीकृत गारमेंट कारखानदार३००सध्या सुरू गारमेंट युनिट्स१५०एकूण कामगार२०,०००कोरोनापूर्वीची युनिफॉर्म उलाढाल४०० कोटी