शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

स्कूल बसचे दर जैसे थे; तुर्तास जूनपर्यंत पालकांना दिलासा

By दिपक दुपारगुडे | Updated: April 4, 2023 14:50 IST

राज्यात ४४ हजार स्कूल बस

सोलापूर : १ एप्रिलपासून स्कूल बस असोसिएशनने १५ ते २० टक्के भाडेवाढ हा निर्णय घेतला होता. त्यानुसार राज्यातील अनेक मेट्रो शहरात स्कूल बसचे दर वाढले आहेत. मात्र, राज्यातील अनेक शहरांत दर वाढलेले आहेत. सोलापुरात मात्र ‘जैसे थे’ अशी स्थिती आहे असे शिवप्रकाश विद्यार्थी वाहतूक संघटनेतर्फे सांगण्यात आले. गेल्या वर्षी असोसिएशनने शालेय बसच्या शुल्कात ३० टक्के वाढ केली होती. कोरोना कालावधीत भाडेवाढ करण्यात आली नाही, असे कारण देऊन थेट ३० टक्के शुल्क वाढवण्यात आले होते.

यंदा पुन्हा २० टक्क्यांपर्यंत शुल्कवाढ करण्याचा निर्णय असोसिएशनने घेतला होता. त्यानुसार रेणके मेट्रो शहरात दरवाढ झालेली आहे. सध्या सोलापुरातील पालकांना दिलासा असला तरी येत्या जूनपासून स्कूल बसच्या दरात वाढ केली जाणार असल्याचेदेखील सांगण्यात आले.

राज्यात साधारणपणे ४४ हजार स्कूल बस असून सोलापुरात ७८५ स्कूल बस आहेत. इंधनाचे दर वाढले आहेत. यासोबतच बसशी संबंधित साहित्याच्या किमतीतही वाढ झाली आहे. अशा स्थितीत नवीन बसचे दरही वाढले आहेत. मिनी बसची किंमत २१ लाख रुपये असून, नवीन बसची किंमत २८ लाख रुपये आहे, तसेच सुटे भाग, बॅटरी इत्यादी बसशी संबंधित इतर वस्तूंच्या किमतीत १२-१८ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली असल्याचे स्कूल बस असोसिएशनचे म्हणणे आहे.

सध्याचे दरसाधारणपणे एका विद्यार्थ्याच्या घरापासून ते शाळेपासूनच्या अंतरावर किमान दर निश्चित केला जातो. सोलापुरातील स्कूल बस १५०० ते २२०० प्रतिविद्यार्थी हे सध्या किमान शुल्क आहे. जूनपासून १५-२० टक्के वाढ झाल्यानंतर प्रतिविद्यार्थी १७२५ ते २७०० असे शुल्क राहणार आहे. स्कूल बसच्या दरवाढीमुळे पालकांच्या खिशाला कात्री लागणार आहे.महागाईमुळे सर्वसामान्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे, राज्यभरात दर वाढलेले असले तरी, सोलापुरात सध्या दर ‘जैसे थे’ आहेत, जूनपासून दरवाढ केली जाऊ शकते.संतोष जाधव,शिवप्रकाश विद्यार्थी वाहतूक संघटना

टॅग्स :Solapurसोलापूर