शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

साता समुद्रा पार! डिसले गुरुजींच्या नावाने परदेशात शिष्यवृत्ती सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2021 05:55 IST

ranjitsinh disale Scholarship in Italy: डिसले गुरुजींची गुणवत्ता, शिक्षण प्रसाराविषयी आस्था लक्षात घेऊन इटली सरकारने त्यांच्या नावे आपल्या देशातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.

- अविनाश साबापुरेलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ग्लोबल टीचर अवार्ड पुरस्काराने महाराष्ट्राच्या ग्रामीण गुणवत्तेची पताका आंतरराष्ट्रीय पातळीवर फडकविणाऱ्या रणजितसिंह डिसले यांच्या नावाने आता थेट इटलीतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. या पुरस्कारातील काही रक्कम त्यांनी इटली येथील शिक्षक कार्लो मझोने यांना दिली होती. त्या रकमेतून इटलीतील गुणवंत विद्यार्थ्यांना ४०० युरोची (३६ हजार रुपये) स्कॉलरशीप देण्याची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे.

डिसले गुरुजींची गुणवत्ता, शिक्षण प्रसाराविषयी आस्था लक्षात घेऊन इटली सरकारने त्यांच्या नावे आपल्या देशातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्हा परिषदेत शिक्षक असलेले रणजितसिंह डिसले यांनी गेल्या वर्षी सप्टेंबर २०२०मध्ये सात कोटींचा ग्लोबल टीचर ॲवार्ड जिंकला. मात्र, हा पुरस्कार जिंकल्यावर त्यांनी पुरस्काराची एवढी मोठी रक्कम शिक्षण प्रसारासाठीच वापरण्याची घोषणा केली. त्यासाठी अर्धी रक्कम म्हणजे साडेतीन कोटी अंतिम फेरीतील अन्य नऊ शिक्षकांना देण्याचे डिसले यांनी जाहीर केले होते. त्यानुसार अंतिम फेरीतील इटली येथील शिक्षक कार्लो मझोने यांनाही रक्कम देण्यात आली. आता इटलीतील सॅमनिटे सरकार मझोने यांना मिळालेल्या रकमेतून इटलीतील गुणवंत विद्यार्थ्यांना ४०० युरोची  (३६ हजार रुपये) स्कॉलरशीप देणार आहे.

  सॅमनिटे राज्यातील विद्यापीठ स्तरावर दहा विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळेल. १० वर्षे १०० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळेल. इटलीतील बेनव्हेन्टो शहराचे महापौर, कॅम्पानिया प्रांताचे शिक्षणाधिकारी विद्यार्थ्यांची निवड करणार आहेत. ‘कार्लो मझोने - रणजित डिसले स्कॉलरशीप’ असे या शिष्यवृत्ती योजनेचे इटली सरकारने नामकरण केले आहे.

जगभरातील गरजू मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून या शिष्यवृत्तीकडे पाहता येईल. इटलीतील ही मुले भारतीय शिक्षण व्यवस्थेत देखील आपले योगदान देतील, असा विश्वास वाटतो. भविष्यात या मुलांना भारतीय संस्कृती, भाषा यांचे शिक्षण देऊन परदेशात देखील भारतीय संस्कृतीचा प्रसार केला जाईल. - रणजितसिंह डिसले, शिक्षक

टॅग्स :Ranjitsinh Disaleरणजितसिंह डिसले