शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरात सॅनिटायझर ‘आऊट ऑफ़ स्टॉक’; मास्कची मनमानी दराने विक्री !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 12:25 IST

कोरोनाचा धसका; सोलापूर शहरवासीयांमध्ये जागरुकता; हॅण्डवॉशची उपलब्धता

ठळक मुद्देशहरातील बहुतांश मेडिकल दुकानांमध्ये सॅनिटायझर उपलब्ध नसल्याचे पाहायला मिळालेहात धुण्यासाठी वापरला जाणारा हॅण्डवॉश मात्र सर्वच मेडिकलमध्ये पुरेशा प्रमाणात उपलब्ध शहरात एम+एम मेडिकल स्टोअरमध्ये मास्क आणि सॅनिटायझरचा पुरेसा साठा

सोलापूर : कोरोनाचा धसका सर्वच स्तरातील नागरिकांनी घेतला असून, याचा परिणाम सॅनिटायझर आणि मास्कच्या विक्रीवर होत आहे. शहरातील औषध विक्री करणाºया दुकानात (मेडिकल) सॅनिटायझर आऊट ऑफ़  स्टॉक झाले असून, मास्कची विक्री मनमानी दराने होत आहे. पर्याय नसल्याने नागरिकही दुकानदार सांगतील त्या दराने मास्क व सॅनिटायझरची खरेदी करत आहेत. ‘लोकमत’च्या टीमने शहरातील विविध भागातील मेडिकल दुकानांमध्ये जाऊन  पाहणी केल्यानंतर ही बाब समोर आली.

 कोरोना विषाणूची दहशत आता सर्वत्र दिसून येत आहे. या रोगाच्या भीतीमुळे मास्कची मागणी वाढली असताना त्याच धर्तीवर हॅण्ड सॅनिटायझरच्या मागणीतही वाढ झाली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून सर्जिकल आणि औषध विक्रेत्यांकडून मास्क व हॅण्ड सॅनिटायझरची धडाक्यात विक्री होत आहे. याचा फायदा काही मॅन्युफॅक्चर कंपन्या, पुरवठादार व विक्रेते घेत असल्याचे चित्र भारतभर पाहायला मिळत आहे.

एरव्ही पाच रुपयाला मिळणारा साधा मास्क आता २० रुपयाला मिळत आहे. वॉशेबल मास्क ५० ते ७० रुपयांपर्यंत विकले                 जात आहेत. नागरिकांना मास्कची इतकी गरज वाटत असल्याने ग्राहक औषधाच्या दुकानात आले असता त्यांना स्टॉक नाही. एवढीच किंमत आहे, आम्हालाच परवडत नसताना आम्ही विकत आहोत. फक्त काही रुपयेच आम्हाला मिळत  आहेत. 

आमच्याच काय इतर कोणत्याही मेडिकलमध्ये जा, तुम्हाला यापेक्षा जास्त किमतीने मास्क विकत मिळतील, असे उत्तर विक्रेत्यांकडून येत आहेत. काही विक्रेत्यांंनी सॅनिटायझरसोबतच मास्कही विक्रीस नसल्याचे सांगितले. विक्री करण्यात  येणाºया मास्कवर एमआरपी नसल्याने ग्राहकांना खरी किंमत कळत नाही.

काही औषध विक्रेत्यांचा प्रामाणिकपणा- बहुतांश औषध विक्रेते चढ्या दराने मास्कची विक्री करत असताना काही प्रामाणिक औषध विक्रेते दिसून आले. डिस्पोजल मास्क, वॉशेबल मास्कची विक्र ी २० ते ३० रुपयांपर्यंत करत असल्याचे दिसून आले. मात्र असे औषध विक्रेते संख्येने शहरात कमी आहेत. शहरातील नागरिकांमध्ये कोरोनाचा धसका आहे. त्यांचे आरोग्य चांगले रहावे, यासाठी ते सॅनिटायझर, मास्क वापरत असताना काही औषध विक्रेते मूळ किमतीत वस्तूंची विक्री करताना पाहायला मिळाले. जास्त मास्क हवे असल्यास संध्याकाळपर्यंत मूळ किमतीत विक्री करू, असा शब्द त्यांनी ग्राहकांना दिला.

येथे मिळेल योग्य दरात मास्क आणि सॅनिटायझर- काही औषध विक्री दुकानांमध्ये मास्क आणि सॅनिटायझर उपलब्ध नाहीत. तसेच चढ्या भावाने त्यांची विक्री होत आहे. मात्र, एम+एम मेडिकल (मेडिसिन अ‍ॅण्ड मोअर) स्टोअरमध्ये मास्क आणि सॅनिटायझर मूळ किमतीत देण्यात येत आहे. शहरात एम+एम मेडिकल स्टोअरमध्ये मास्क आणि सॅनिटायझरचा पुरेसा साठा आहे. या प्रकारचे सुमारे २५ मेडिकल स्टोअर आहेत. येथे एमआरपीप्रमाणे किंवी एमआरपीपेक्षा कमी दराने त्याची विक्री करत असल्याचे सोलापूर डिस्ट्रिक्ट केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष बसवराज मणुरे यांनी सांगितले.

ब्रॅण्डेड सॅनिटायझर झाले गायब-  शहरातील बहुतांश मेडिकल दुकानांमध्ये सॅनिटायझर उपलब्ध नसल्याचे पाहायला मिळाले. ज्या मेडिकलमध्ये सॅनिटायझर होते ते ब्रॅण्डेड नव्हते. मात्र त्याची किंमत ही ब्रॅण्डेड कंपनीच्या सॅनिटायझरएवढीच होती. या सॅनिटायझरची विक्री ही एमआरपीप्रमाणे होत असल्याचे दिसून आले. हात धुण्यासाठी वापरला जाणारा हॅण्डवॉश मात्र सर्वच मेडिकलमध्ये पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. हॅण्डवॉशच्या किमतीत कोणतीही वाढ करण्यात आलेली नव्हती.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोनाHealthआरोग्यMedicalवैद्यकीय