शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छता सोलापुरी; राज्यात यंदा पंधराव्या क्रमांकावरी, गतवर्षीपेक्षा चांगली कामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 12:56 IST

सोलापूर : स्वच्छ भारत सर्वेक्षण २०१९ मध्ये सोलापूर महापालिकेने देशात ५४ वा क्रमांक पटकाविला आहे तर महाराष्ट्रात १५ वा ...

ठळक मुद्देस्वच्छ भारत सर्वेक्षणात देशातील ४ हजार शहरांनी सहभाग नोंदविलास्वच्छ भारत सर्वेक्षण २०१७  मध्ये सोलापूर महापालिका ११५ व्या स्थानी२०१९ च्या सर्वेक्षणात सहभाग नोंदविताना घनकचरा व्यवस्थापनाने शहर कचरा कोंडाळेमुक्त

सोलापूर : स्वच्छ भारत सर्वेक्षण २०१९ मध्ये सोलापूर महापालिकेने देशात ५४ वा क्रमांक पटकाविला आहे तर महाराष्ट्रात १५ वा क्रमांक पटकाविला आहे.  गेल्या दोन वर्षांतील ही सुधारित कामगिरी असल्याचे मनपा उपायुक्त त्रिंबक ढेंगळे-पाटील यांनी सांगितले.

 ढेंगळे-पाटील म्हणाले, स्वच्छ भारत सर्वेक्षणात देशातील ४ हजार शहरांनी सहभाग नोंदविला होता. स्वच्छ भारत सर्वेक्षण २०१७  मध्ये सोलापूर महापालिका ११५ व्या स्थानी होती तर २०१८ मध्ये ८६ व्या स्थानी होती. २०१९ च्या सर्वेक्षणात सहभाग नोंदविताना घनकचरा व्यवस्थापनाने शहर कचरा कोंडाळेमुक्त केले. बाजारपेठेच्या ठिकाणी ओला आणि सुका कचरा संकलित करण्यासाठी लिटरबीन्स लावण्यात आले. महापालिकेच्या वतीने भोगाव येथील कचरा डेपोच्या जागेवर बायोएनर्जी प्रकल्प राबविला जातो. त्याचेही जादा गुण मिळाले आहेत.

 स्मार्ट सिटी योजनेतून १२० घंटागाड्या घेण्यात आल्या. त्यांना रुट मॅपिंग करण्यात आले. गाड्यांना जीपीएस सिस्टिम लावण्यात आली. घंटागाड्या घरोघरी जाऊन ओला आणि सुका कचरा संकलित करीत आहेत. प्लास्टिक  बंदी लागू झाल्यानंतर महाराष्ट्रातील पहिली दंडाची पावती सोलापुरात करण्यात आली. सर्वेक्षण करणाºया समितीने शहरातील सामुदायिक शौचालये फाईव्ह स्टार रेटिंगचे असावेत, असा दंडक घातला आहे. आपण शौचालयांची  दुरुस्ती केली आहे. सर्वच ठिकाणे आरसे, दिव्यांगांसाठी रॅम्प लावले आहेत.

पुढील वर्षी पहिल्या दहामध्ये येऊ : ढेंगळे-पाटील- डिजिटल सर्वेक्षणात नागरिकांच्या सूचना आणि प्रतिसादही महत्त्वाचा आहे. सफाई कर्मचारी आणि अधिकाºयांनी केलेल्या उत्कृष्ट कामामुळे हे शक्य झाले आहे.  यावर्षी पुन्हा चांगली कामगिरी होईल. घंटागाड्यातील कचरा संकलित करण्यासाठी आणखी दोन कचरा स्टेशन लवकरच सुरू होणार आहे. पुढील वर्षी देशात पहिल्या १० मध्ये येण्यासाठी प्रयत्न करु.

शहर आता पूर्वीपेक्षा चांगले दिसायला लागले आहे. सर्वसामान्य सफाई कर्मचारी बºयाच ठिकाणी अहोरात्र काम करीत आहेत. मोदी सरकारकडून घनकचरा व्यवस्थापन विभागाला चांगला निधी मिळाला आहे. स्मार्ट सिटी योजनेतून घेतलेल्या घंटागाड्यांमुळे चांगली मदत झाली आहे. यामुळेच स्वच्छ भारत अभियानात मनपाची कामगिरी मागच्या तुलनेत चांगली झाली आहे. पुढील वर्षी पहिल्या दहा क्रमांकात येण्यासाठी प्रशासनाला आमचे सहकार्य राहील.  

- संजय कोळी, सभागृह नेते

आम्ही सत्तेवर आलो तेव्हा घंटागाड्याचे खासगीकरण झाले होते. आमच्यातील काही लोकांचा विरोध असतानाही हे खासगीकरण रद्द केले. त्यातून महापालिकेचे ५८ कोटी रुपये वाचले. मनपा प्रशासनाकडून घंटागाड्याचे काम सुरू झाले. शहरातील नागरिकांनी रस्त्यावर कचरा न टाकता घंटागाड्यांमध्ये टाकायला सुरुवात केली. व्यापाºयांनीही शिस्त लावून घेतली. घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या अधिकाºयांची, सफाई कर्मचाºयांनी चांगले काम केले. त्यामुळे या अभियानात चांगली कामगिरी झाली आहे. - शोभा बनशेट्टी, महापौर

टॅग्स :SolapurसोलापूरSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका