सांगोला शहरात प्रभाग क्र. १ मधील आ.क्र. ४६ बगीचासह प्रभाग क्र. ३ मधील आठवडा बाजार येथे २ हायमास्ट दिवे, प्रभाग क्र. ४ मधील तेली गल्ली इंगोले घराजवळ, वज्राबाद पेठ मारुती मंदिराजवळ, धनगर गल्ली सार्वजनिक शौचालयाजवळ, धनगर गल्ली गणेश निंबाळकर घरासमोर, इंदिरानगर झोपडपट्टी, प्रभाग क्र. ५ मधील संजयनगर झोपडपट्टी, प्रभाग क्र. ६ मधील सावंत वस्ती शिवाजी चौक, चांडोलेवाडी चौक, प्रभाग क्र. ७ मधील स्टेशन रोड जुन्या स्टेट बँकेसमोर, प्रभाग क्र. ९ मधील महादेव मंदिर महादेव गल्ली असे १३ हायमास्ट दिव्यांना आ. प्रशांत परिचारक यांच्या फंडातून मंजुरी मिळाली आहेत. लवकरच कामास सुरुवात करून हायमास्ट बसविण्यात येतील, असे नगराध्यक्षा राणी माने यांनी सांगितले.
सांगोला शहरात १३ हायमास्ट दिव्यांना मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:14 IST