शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
"...तर रशियाही अणु चाचण्या करेल";व्लादिमीर पुतीन यांची थेट अमेरिकेला धमकी
4
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
5
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
6
२०२७ पर्यंत ५ राशींना साडेसाती, प्रदोषात ‘हे’ करावे; पंचक कायमचे टळेल, शनि शुभ-कल्याण करेल!
7
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
8
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
9
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
10
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
11
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
12
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
13
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैन्याची थट्टा; फक्त १० रुपयांत गणवेश-हेल्मेट विक्रीला, व्हिडीओ व्हायरल
14
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?
15
केएल राहुलचा 'डबल' धमाका! विराट कोहली आणि रोहित शर्माचा कसोटीतील मोठा विक्रम मोडला
16
तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट!
17
World Smile Day: ज्याला मिम मटेरिअल समजता, त्याने नुसतं हसून कमावले ३ मिलियन डॉलर!
18
हात पकडून जोरात ओढले..; तीन वर्षीय चिमुकलाने वाचवला आईचा जीव; पाहा धक्कादायक Video
19
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
20
भारतीय कंपनी आणतेय ७००० mah बॅटरीवाला प्रिमिअम फोन, ‘Pixel’ सारखा कॅमेरा डिझाइन; पण किंमत नसेल स्वस्त...

झटपट लग्नात समोशांवर खुश झाली वºहाडी मंडळी; वधूने बागायतदार वराच्या गळ्यात घातली वरमाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 12:19 IST

सोलापूर : मुलगी पदवीधर तर मुलगा बागायतदार शेतकरी... दोघांचे लग्नही ठरलेले... २३ एप्रिल २०१९ रोजी इंद्रप्रस्थ हॉलमध्ये थाटामाटात लग्नही ...

ठळक मुद्दे२३ एप्रिलचे लग्न साखरपुड्यातच : डामडौल, वरातीसह अन्य बाबींच्या खर्चाला फाटादोन्ही कुटुंबांनी एक वेगळा आदर्श समाजासमोर घालून दिला

सोलापूर : मुलगी पदवीधर तर मुलगा बागायतदार शेतकरी... दोघांचे लग्नही ठरलेले... २३ एप्रिल २०१९ रोजी इंद्रप्रस्थ हॉलमध्ये थाटामाटात लग्नही होणार होते... मात्र रविवारी साखरपुडा झाल्यावर गप्पा रंगल्या अन् मुलीच्या काकाने लग्न करण्याचा प्रस्ताव मांडला. वधू-वरांकडील मंडळींनी होकार देताच अवघ्या काही तासांमध्ये रविवारी सायंकाळी साडेसहाच्या गोरजमुहूर्तावर विवाह पार पडला. फलटणचे बागायतदार गणेश जाधव यांच्या गळ्यात गीता खुळे हिने वरमाला घातली. झटपट लग्नात समोशावर ताव मारत वºहाडी मंडळी सुखावली.

त्याचे असे झाले, बाळे येथील एलएचपीमध्ये नोकरीस असलेले सतीश खुळे यांची गीता ही मुलगी. काही दिवसांपूर्वी तिचे लग्न फलटण येथील गणेश जाधव या बागायतदार युवा शेतकºयाबरोबर जमले होते. २३ एप्रिल २०१९ ही तारीखही काढण्यात आली. जुन्या एम्प्लॉयमेंट चौकातील इंद्रप्रस्थ हॉलही बुक झाले. आचारी, बॅन्ड, घोडा आदींची बुकिंगही करण्यात आली. रविवारी सकाळी एन. जी. मिल चाळीतील घरात साखरपुडा पार पडला. फलटणहून आलेल्या २५ ते ३० वºहाडी मंडळींनी भोजनाचा आस्वाद घेतला. त्यानंतर वधू अन् वरांकडील मंडळी गप्पा मारत बसली होती. 

बारामती येथील मुलीचे मामा किसन शिंदे यांनी आजच्या आज लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला. दोन्हीकडील मंडळींनी त्यास होकार दिला. त्यावेळी दुपारचा एक वाजला होता. रविवारी सायंकाळी ६.३० या गोरज मुहूर्तावर लग्न करण्यावर साºयांचेच एकमत झाले. म्हणता-म्हणता मुलीसाठी शालू, बांगड्या, मंगळसूत्र तर मुलासाठी खास पोशाख मागविण्यात आले. फोनाफोनी करून मुलीच्या मैत्रिणींना बोलावून घेतले. इकडचे अन् तिकडचे असे १०० वºहाडी मंडळी जमली. घराजवळच असलेल्या हनुमान मंदिरात नववधू-वराने दर्शन घेतले आणि काही मिनिटांतच उभारण्यात आलेल्या मांडवात दोघे विवाहबद्ध झाले. भोजन म्हणून समोश्यांचा आस्वाद वºहाडी मंडळींनी घेतला. 

मुलीने दिले शेतकरी वरास प्राधान्य- नववधू गीता खुळे ही शिकलेली. पदवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या गीताने शिकलेला नव्हे तर उच्च शिक्षित अन् तेही उच्च पदावर नोकरीस असलेला जीवनसाथी निवडणार, अशीच धारणा होती. मात्र वडिलांनी आपल्यासाठी जे स्थळ जमविले, ते नक्कीच माझा विचार करूनच निवडले असतील, ही खूणगाठ बांधून गीतानेही वडिलांंचा विश्वास सार्थ ठरवत फलटणच्या या बागायतदार वराच्या गळ्यात वरमाला घालत इतरांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.

रविवारी सकाळी साखरपुड्याच्या कार्यक्रमाला येण्याचे आमंत्रण मिळाले. मात्र महत्त्वाच्या कामासाठी जाणे जमले नाही. दुसरा निरोप आला की, लग्नाला या. काहीच कळेना. साखरपुडा कोणाचा अन् लग्न कोणाचे? हा प्रश्न घेऊनच लग्नमांडवात गेलो तर काय साखरपुडा झालेल्या त्या नववधू-वरांचेच लग्न होते. दोन्ही कुटुंबांनी एक वेगळा आदर्श समाजासमोर घालून दिला आहे.-विनोद भोसले, नगरसेवक. 

टॅग्स :Solapurसोलापूरmarriageलग्न