शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
2
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
3
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
4
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
5
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
6
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
7
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
8
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
9
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
10
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
11
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
12
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
13
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
14
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
15
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
16
बाजारात 'मंदीचा' सोमवार! सेन्सेक्स-निफ्टी धडाधड कोसळले; 'या' ५ कारणांमुळे घसरण
17
दीड लाख पगार अन् राहण्या-खाण्याची सोय! रशियात भारतीयांसाठी मोठी संधी, असे मिळवा वर्क परमिट
18
Prakash Mahajan: "भाजपच्या घराला दार नाही, फक्त पहारेकरी" प्रकाश महाजन यांचा घणाघात!
19
"आमिर खानचे पैसे माझे नाहीत..."; बॉलिवूडपासून दूर असलेला इमरान खान सापडलेला आर्थिक संकटात, म्हणाला...
20
आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी, ‘या’ राज्यातील सरकारने दिले आदेश
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभा निवडणुकीसाठी आजपासून अर्ज विक्री सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 12:51 IST

सोलापूर जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण; तहसील कार्यालयांमध्ये केली सोय

ठळक मुद्देविधानसभा मतदानसंघासाठी प्राधिकृत केलेले अकरा निवडणूक अधिकाºयांनी प्रशासकीय तयारी पूर्ण केली उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना विविध परवाने देण्याच्या कामकाजास सुरूवात जिल्हा कक्षाची स्थापना करण्यात आली असून, नोडल अधिकारी म्हणून पंकज जावळे, बसवराज बिराजदार यांची नियुक्ती

सोलापूर : जिल्ह्यातील अकरा विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज विक्री व स्वीकारण्याच्या प्रक्रियेस शुक्रवार दि. २७ सप्टेंबरपासून सुरूवात करण्यात येणार आहे. 

जिल्ह्यातील अकरा विधानसभेच्या जागेसाठी २७ सप्टेंबर ते ४ आॅक्टोबर या कालावधीत अर्ज विक्री व स्वीकृतीची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी ३०० अर्ज उपलब्ध करण्यात आले आहेत. अर्जासोबत प्रतिज्ञापत्राचा नमुना उपलब्ध करण्यात आला आहे. निवडणूक उमेदवारी अर्ज विक्री व स्वीकृतीची प्रक्रिया राबविण्यासाठी सर्व निवडणूक कार्यालयात तयारी करण्यात आली आहे.

पार्किंग व्यवस्थेपासून अर्ज विक्री व स्वीकृती टेबलावर फलक, संबंधित अधिकाºयांची नावे ठळकपणे लावण्यात आली आहेत. सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळात सुटीचे दिवस वगळून हे कामकाज चालणार आहे. नामनिर्देशन पत्रांची छाननी ५ आॅक्टोबर रोजी करण्यात येणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत ७ आॅक्टोबरपर्यंत आहे. या दिवशी निवडणूक रिंगणात कोण कोण असतील हे चित्र स्पष्ट होणार आहे. 

विधानसभा मतदानसंघासाठी प्राधिकृत केलेले अकरा निवडणूक अधिकाºयांनी प्रशासकीय तयारी पूर्ण केली आहे. उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना विविध परवाने देण्याच्या कामकाजास सुरूवात करण्यात आली आहे. यासाठी जिल्हा कक्षाची स्थापना करण्यात आली असून, नोडल अधिकारी म्हणून पंकज जावळे, बसवराज बिराजदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक मतदार संघाच्या निवडणूक कार्यालयातील एक खिडकीमध्ये परवान्यासाठी अर्ज करावयाचे आहेत. परवान्यामध्ये वाहन, प्रचार कार्यालये, सभा, फलक  लावणे व पत्रके छापण्याच्या परवान्यासाठी अर्ज येण्यास सुरूवात झाली आहे. वाहन परवान्यासाठी आरटीओ तर सभा, ध्वनीक्षेपक परवान्यासाठी पोलीस, महापालिकेची एनओसी आवश्यक आहे. 

सोलापुरात तीन ठिकाणी सोय- सोलापुरात दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयात दक्षिण सोलापूर, उत्तर तहसीलमध्ये  शहर मध्य व दक्षिण सोलापूर खरेदी कार्यालयाशेजारी शहर उत्तर विधानसभेसाठी अर्ज विक्री व स्वीकृतीची सोय करण्यात आली असल्याचे निवडणूक उपजिल्हाधिकारी स्नेहल भोसले यांनी सांगितले.  

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारण