शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
2
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
5
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
6
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
7
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
8
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
9
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
10
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
11
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
12
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
13
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
14
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
15
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
16
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
17
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
18
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
19
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
20
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही

सोलापूर जिल्हा परिषदेतील १२० दांडीबहाद्दरांची पगार कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 12:27 IST

सर्व विभागातील हजेरी पुस्तकाची तपासणी करण्याचे आदेश दिले.

ठळक मुद्दे कामावर गैरहजर असलेल्या  १२०  कर्मचाºयांचे एक दिवसाचे वेतन कापण्याचे आदेशजिल्हा परिषदेचे सर्व विभागप्रमुख वेगवेगळ्या कामाच्या निमित्ताने बाहेर होते

सोलापूर : साहेब नाहीत म्हटल्यावर आपलेच राज्य समजून निवांतपणे कामावर येणाºया आणि दांडी मारणाºया कर्मचाºयांना जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी कारवाईचा दणका दिला. सकाळी कामावर गैरहजर असलेल्या  १२०  कर्मचाºयांचे एक दिवसाचे वेतन कापण्याचे आदेश त्यांनी दिले. 

जिल्हा परिषदेचे सर्व विभागप्रमुख गुरुवारी वेगवेगळ्या कामाच्या निमित्ताने बाहेर होते. अधिकारी नसले की कर्मचारी कामावर निवांतपणे येतात किंवा कामाला दांडीही मारतात. महापालिकेतील विषय समित्यांची निवडणूक गुरुवारी झाली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड निवडणूक निर्णय अधिकारी होते.

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पोपट बनसोडे बैठकीसाठी पुण्याला गेले होते. इतर दोन उपमुख्य कार्यकारी अधिकारी बैठकीसाठी बाहेरगावी तर दोन अधिकारी रजेवर होते. खाते प्रमुख कार्यालयात येणार नसल्याने आजचे काम निवांतपणेच चालेल, असा कर्मचाºयांचा अंदाज होता. मात्र सीईओ डॉ. राजेंद्र भारुड यांनी सकाळी १० वा. कार्यालय गाठले. सर्व विभागातील हजेरी पुस्तकाची तपासणी करण्याचे आदेश दिले. यानंतर डॉ. भारुड तत्काळ महापालिकेककडे रवाना झाले.

...आणि गाडी वळविण्यास सांगितले- महापालिकेच्या विषय समित्यांची निवडणूक प्रक्रिया सकाळी १०.३० वा. सुरू होणार होती. त्यासाठी डॉ. भारुड घरातून लवकर निघाले होते. सात रस्त्यापर्यंत आल्यानंतर त्यांनी चालकाला गाडी जिल्हा परिषदेकडे वळविण्यास सांगितले. सकाळी १० वा. ते आपल्या कार्यालयात हजर झाले. यादरम्यान साहेबांची गाडी पाहून काही कर्मचाºयांची पळापळ झाली. कार्यालयात आल्यानंतर त्यांनी हजेरी पुस्तकाची तपासणी करण्याचे आदेश दिले. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडून सायंकाळी परतल्यानंतर १२० कर्मचाºयांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. 

विभागनिहाय गैैरहजर कर्मचारी- सामान्य प्रशासन विभाग १८, महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना ३, समाजकल्याण ९, पाणी व स्वच्छता १२, ग्रामीण पाणीपुरवठा ५, ग्रामपंचायत ४, पशुसंवर्धन १, महिला व बालकल्याण ३, प्राथमिक शिक्षण विभाग १६, बांधकाम विभाग क्र. १ : ४, अर्थ विभाग ६, लघु पाटबंधारे १, बांधकाम क्र. १ : ८, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा ३, माध्यमिक शिक्षण विभाग ७, आरोग्य १२, कृषी ८. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषद