शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

संत सज्जनांची मांदियाळी पंढरीच्या वाटेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 13:19 IST

बाळासाहेब बोचरेसोलापूर: आषाढी वारी कधी येईल, पंढरपूरला कधी एकदा जाईन आणि सावळ्या विठुरायाला कधी एकदा कडकडून मिठी मारेन या उत्कट ओढीने हरिनामाच्या जयघोषात तल्लीन होऊन निघालेल्या संत सज्जनांच्या पालख्या पंढरीच्या वाटेला लागल्या आहेत.सर्वात अगोदर खान्देशातून संत मुक्ताबाईने प्रस्थान केले. त्यापाठोपाठ संत गजानन महाराज, संत एकनाथ आणि संत निवृत्तीनाथांनी प्रस्थान केले. ...

ठळक मुद्देसंत सोपानदेवांची पालखी १० जुलैला सासवडहून निघणारसंत दामाजी पंतांची पालखी २१ जुलैला निघणारसंत एकनाथ आणि संत मुक्ताबाई यांची बीड जिल्ह्यातून वाटचाल सुरू

बाळासाहेब बोचरेसोलापूर: आषाढी वारी कधी येईल, पंढरपूरला कधी एकदा जाईन आणि सावळ्या विठुरायाला कधी एकदा कडकडून मिठी मारेन या उत्कट ओढीने हरिनामाच्या जयघोषात तल्लीन होऊन निघालेल्या संत सज्जनांच्या पालख्या पंढरीच्या वाटेला लागल्या आहेत.

सर्वात अगोदर खान्देशातून संत मुक्ताबाईने प्रस्थान केले. त्यापाठोपाठ संत गजानन महाराज, संत एकनाथ आणि संत निवृत्तीनाथांनी प्रस्थान केले. जगद्गुरू तुकाराम महाराजांनी ५ जुलैला तर सर्वांची माऊली म्हणून ख्यात असलेली संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ६ जुलैला निघाली. रविवारी या दोन्ही पालख्या पुण्यात मुक्कामी होत्या.

निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम यापैकी संत सोपानदेव व नामदेवांची  पालखी वगळता सर्व पालख्या झपझप पावले टाकत वाटचाल  करत आहेत. संत सोपानदेवांची पालखी १० जुलैला सासवडहून निघणार आहे तर संत नामदेवांची पालखी पंढरपुरातून संतांच्या स्वागतासाठी काढली जाते. संत दामाजी पंतांची पालखी २१ जुलैला निघणार आहे. संत एकनाथ आणि संत मुक्ताबाई यांची बीड जिल्ह्यातून वाटचाल सुरू आहे. निवृत्तीनाथ नगरला आले आहेत तर गजानन महाराजांनी उस्मानाबाद जिल्ह्यात प्रवेश केला आहे. 

लहान-मोठ्या पालख्यांचीही दखल घेणे गरजेचे आहे.  संत ज्ञानेश्वर महाराज व तुकाराम महाराज यांच्या पालख्यांसोबत वारकºयांची संख्या जास्त असते.  त्यामुळे प्रशासन सर्व लक्ष त्यांच्यावर केंद्रित करते.  इतर पालख्यांबरोबरही तुलनेने कमी असले तरी बºयापैकी वारकरी असतात.  त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते.  टेंभुर्णी ते नगर मार्गाचे चौपदरीकरण झाले तर निवृत्तीनाथांचा मार्ग सुकर होईल.  - मोहनमहाराज बेलापूरकर, निवृत्तीनाथ पालखी सोहळा

टॅग्स :SolapurसोलापूरAshadhi Ekadashiआषाढी एकादशीPandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळा