शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

दूध आंदोलनावरून सदाभाऊ- राजू शेट्टी आमनेसामने; नगरमध्येही राम शिंदे-लोखंडे यांच्यात जुगलबंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2020 05:40 IST

माझ्या नावावर ३०० ते ४०० एकर जमीन असेल तर तिची विक्री करू आणि कडकनाथ कोंबडी प्रकरणात ज्या शेतकऱ्यांचे पैसे बुडाले त्यांना ते पैसे देऊ, असा टोला शेट्टी यांनी लगावला.

पंढरपूर/कोल्हापूर : दूध दरवाढीच्या आंदोलनावरून एकेकाळचे शेतकरी चळवळीतील शिलेदार माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी पुन्हा आमनेसामने आले आहेत. राजू शेट्टी आता काजू शेट्टी झालेले आहेत. ते भ्रमिष्ट झाले आहेत. अशी माणसं प्रत्येक गावात तोंड घालतात, त्यांना गांभीर्याने घ्यायचे नसते, अशी टीका माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी दूधदरवाढीच्या आंदोलनावेळी केली. खोत म्हणाले, तुम्ही सरकारमध्ये आहात. शेतकऱ्यांना का न्याय मिळत नाही ? आंदोलन करायचे नाटक करू नका. सदाभाऊंनी तुमच्यासारख्या शेकडो एकर जमिनी घेऊन ठेवल्या नाहीत. शेट्टी यांना सगळीकडे सदाभाऊच दिसताहेत.

त्यावर शेट्टी म्हणाले, माझ्या नावावर ३०० ते ४०० एकर जमीन असेल तर तिची विक्री करू आणि कडकनाथ कोंबडी प्रकरणात ज्या शेतकऱ्यांचे पैसे बुडाले त्यांना ते पैसे देऊ, असा टोला शेट्टी यांनी लगावला.

‘आमच्या नेत्यांमध्ये चार बायका सांभाळण्याची ताकद’

अहमदनगर : एका नवºयाच्या दोन बायका असे हे तिघाडी सरकारआहे. त्यांना शेतकºयांचे काहीहीघेणे-देणे नाही, अशी टीका माजीमंत्री राम शिंदे यांनी येथेदूध आंदोलनावेळी केली. त्यावरज्या नवºयामध्ये दोन बायका सांभाळण्याची ताकद असते, तोदोनच काय चार बायकाहीसांभाळू शकतो. आमचे नेतेही त्या ताकदीचे आहेत, असे प्रत्युत्तर शिवसेनेचे शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी दिले.भाजपला आंदोलन करण्याचा अधिकारच नाही - थोरातमुंबई : पाच वर्ष भाजपचे सरकार होते, त्यावेळी त्यांनी दुधाच्या प्रश्नावर शेतकºयांना न्याय दिला नाही, आणि आता तेच आंदोलन करत आहेत, अशी टीका महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.केंद्र सरकारने दहा लाख मेट्रिक टन दूध पावडर न्यूझीलंडहून आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. तो रद्द करण्यासाठी भाजपने प्रतिष्ठा पणाला लावावी. मात्र स्वत:चे ठेवायचे झाकून अन दुसºयाचे पहायचे वाकून, या वृत्तीने भाजपचे नेते महाराष्ट्रात शेतकºयांची दिशाभूल करण्याचे काम करत आहेत, अशी टीकाही थोरात यांनी आहे.नाचता येईना अंगण वाकडेवडगाव मावळ (पुणे) : मुख्यमंत्री म्हणतात, मला शेतातील काही कळत नाही. रात्री एक वाजेपर्यंत पोलिसांच्या बदल्या करण्यासाठी जसे लक्ष घालता तसे लक्ष शेतकºयांच्या प्रश्नांवर घाला. नाचता येईना, अंगण वाकडे, अशी सरकारची स्थिती असल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.

टॅग्स :Solapurसोलापूर