शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सब्बाह म्हणजे देवाचा आराम करण्याचा दिवस...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 14:29 IST

सब्बाह म्हणजे देवाचा आराम करण्याचा दिवस, असे ज्यू लोकांचे म्हणणे आहे. आठवड्यातल्या शनिवारी ते सुट्टी घेतात. ही सुट्टी शुक्रवारपासून ...

सब्बाह म्हणजे देवाचा आराम करण्याचा दिवस, असे ज्यू लोकांचे म्हणणे आहे. आठवड्यातल्या शनिवारी ते सुट्टी घेतात. ही सुट्टी शुक्रवारपासून सुरू होते. ही सुट्टी आपल्यासारखी नसते. आपण रविवारीदेखील काम करतो, हे किती अभिमानानं सांगतो. इथे सुट्टी म्हणजे सुट्टी. इथली लोकल रेल्वेपण पळत नाही या दिवशी.

आपण बदली सुट्टी देतो. काही वर्कोहोलिक लोकांसाठी हे बरंय. त्यांना कळतच नाही थांबायचं कुठं. काम करत राहतात. ही जबरी सुट्टी भारीय. इतर सणासुदीच्या सुट्ट्या अगदी किरकोळ असतात. म्हणून इकडे या सुट्टीचं कौतुक. आपल्याकडे दरमहा निदान दोन तरी सणवार, जयंती, पुण्यतिथीच्या सुट्ट्या असतात. नुकतेच उत्तर प्रदेश सरकारने सुट्ट्या कमी केल्यात. नेत्यांच्या जयंती, पुण्यतिथी दिवशी त्यांचे स्मरण करावे, काही कार्यक्रम करावेत हे अपेक्षित आहे. आपल्या राज्यात पण असं व्हावं.

तर शनिवार सुट्टीचा दिवस. मला नेमका हाच विषय सापडला लिखाणाला सुरुवात करण्यासाठी. तब्बल एक आठवडा उलटून गेला मला इथे येऊन; पण खूप दिवसांपासून इथेच राहतोय असे वाटतेय. खरंतर मी इस्राईलला जाणार हे माझे मलाच खरे वाटत नव्हते. मी एकटी प्रवास करणार म्हणजे कल्याणच. कारण मुळात काही न् काही विसरणे, ऐनवेळी गोंधळणे असा माझा स्वभाव; पण यावेळी चक्क शुक्रवारी (आदल्या दिवशी) सुट्टी घेऊन पॅकिंग केले. एक चेकलिस्ट केली. ही लिस्ट मी आठवडाभर करत होते. शुक्रवारी फक्त लिस्टप्रमाणे पॅकिंग केले. लगेजच्या वजनाची अट असल्याने अगदी तोलून-मापून कपडे घेतले. बºयाच जणांनी चटणी न्यायला सांगितलेली; पण घेतली नाही. बघू या म्हटलं सात्विक आहारामुळे आपल्या तापट स्वभावात काही बदल होतोय का ते?एवढं करून थंडीचे कपडे राहिले; मग मुंबईत शाल घेतली. ठरल्याप्रमाणे तीन तास आधी आम्ही विमानतळाकडे निघालो. एवढ्या मोठ्या आलिशान कारमधून जाताना बरेच जुने दिवस आठवले; पण त्याचवेळी एफएमवर गाणं लागलं होतं ‘छोड आए हम वो गलिया...’

चेकइन करताना विचारल्या जाणाºया प्रश्नांची उजळणी अनयने करून घेतली होतीच. वास्तविक पाहता माझे जाणे अनयमुळेच झाले. अगदी फॉर्म भरण्यापासून त्याने मदत केली. हा फॉर्म भरल्यानंतर फोनवरून एक मुलाखत इस्राईल दूतावासातून घेतली जाते. मला ही मंडळी दोन दिवसांपासून कॉल करीत होती; पण मी कॉलच घेत नव्हते. अनयने फोनवरून सांगितले तेव्हा कुठे माझी मुलाखत झाली. माझी बरीच कामे तत्काळ पार पडली; पण नेमकी चेकइन करताना एका प्रश्नाला दिलेल्या उत्तरामुळे जरा खोळंबा झाला. त्यांनी मला विचारले, या ट्रेनिंगविषयी तुम्हाला प्रथम कोणाकडून माहिती मिळाली? न गोंधळता खरी उत्तरे द्या, त्यांना तुमच्या उत्तरापेक्षा ते देताना तुमच्यातल्या आत्मविश्वासाची परीक्षा करायची असते, असे अनयने सांगितले होते. म्हणून मी डॉ. कादरभाई मॅडमचे नाव घेतले. झाले... मुस्लीम नाव ऐकल्यावर त्यांच्या भुवया ताणल्या. मग मला पुन्हा वरिष्ठांकडे पाठविले गेले. त्यांनी डॉ. कादरभार्इंची सगळी माहिती घेतली. थोडावेळ गेला; पण सुखरूपपणे या सर्व सोपस्कारातून पार पडत विमानात बसले एकदाची.

माझा हा प्रथमच प्रदेश दौरा. बरेच कुतूहल, बरीच धाकधूक लागलेली. आपण एखादी गोष्ट पूर्वी कधी केली नसेल व एकट्यानेच ती पार पाडायची असेल, तर थोडी भीती वाटणे अगदी स्वाभाविक आहे. यापूर्वी देशांतर्गत विमान प्रवास झालेला म्हणून विमानात बसण्याचं कौतुक नव्हतं. रात्रभर झोप मात्र आली नाही. वेगवेगळी माणसं, त्यांची भाषा, इस्राईलमध्ये उतरल्यावर ट्रेनिंग सेंटरपर्यंत पोहोचण्याचा ताण आदींमुळं असेल कदाचित. विमानात टीव्ही चालू होता. त्यावर इस्राईल दर्शन होत होतं. विमानातील जेवणाची चव चाखली आणि पुढे खाण्याचे काय हाल होणार आहेत, त्याची जाणीव झाली. टीव्हीवर लागलेला चित्रपट पाहत होते, भाषा कळत नव्हती; पण चेहºयावरचे हावभाव पाहून समजून घेत होते. मजा वाटत होती. आले एकदाचे तेल अविव. झाले लँडिंग. मी आधी माझे घड्याळ अ‍ॅडजस्ट केले. अडीच तास पुढे करून घेतले. माझा मोबाईल स्मार्ट असल्यानं त्यानं ते काम आधीच केलं होतं. यामुळं मला इस्राईलला राहून तेथील कृषी क्षेत्रातील बदल टिपता आले. त्यावर विपुल असं लेखन करणे शक्य झाले.- प्रा. अनिता ढोबळे(लेखिका कृषी क्षेत्रातील अभ्यासक आहेत.)

टॅग्स :Solapurसोलापूरtourismपर्यटन