शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रूबेला लस मृत्यू प्रकरण ; ऋषीकेशचा मृत्यू मेंदूज्वरमुळे झाल्याचा अहवालात स्पष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 12:49 IST

 जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार याची माहिती;  लसीकरणासाठी लोकप्रतिनिधींना विनंती करू

ठळक मुद्देगोवर-रुबेला ही  राष्ट्रीय  लसीकरण मोहीमलसीकरणासाठी शहर आणि जिल्ह्यातील १० लाख ५० हजार बालकांचे उद्दिष्टआतापर्यंत ४ लाख २४ हजार ४१६ मुलांना लस देण्यात आली

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज (आ) येथील ऋषीकेश शिवानंद डोंबाळे (वय ९) या विद्यार्थ्याला मेंदूज्वर हा आजार होता, त्याला  मलेरियाची लागण झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक अहवालात स्पष्ट झाले आहे. गोवर-रुबेला ही  राष्ट्रीय  लसीकरण मोहीम आहे. या मोहिमेस लोकप्रतिनिधी यांचा विरोध होत असल्यास त्यांना भेटून महत्त्व पटवून देणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

२७ नोव्हेंबरपासून लसीकरण मोहिमेस सुरुवात करण्यात आली आहे. लसीकरणासाठी शहर आणि जिल्ह्यातील १० लाख ५० हजार बालकांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, आतापर्यंत ४ लाख २४ हजार ४१६ मुलांना लस देण्यात आली आहे. यासाठी लस टोचक यांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. ५ जानेवारीपर्यंत ही मोहीम चालू राहणार आहे.

लसीकरणामुळे बाधित झालेल्या बालकांवर अधिक लक्ष ठेवण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे जिल्हा आरोग्य कार्यालयाच्या वतीने वैद्यकीय पथक मदतीला राहणार आहे. या पथकाच्या माध्यमातून बालकांना आवश्यक ती मदत, औषधे आणून देणे तसेच संपूर्ण मोफत उपचार केला जाणार असल्याचेही यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जमादार यांनी सांगितले.

 लस रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठीच्बालकांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती निर्माण व्हावी, यासाठी रुबेला ही लस देणे आवश्यक आहे. रुबेला ही लस  बालकांसाठी चांगली आहे. आपला ज्या डॉक्टरांवर विश्वास आहे, अशा बालरोग तज्ज्ञाकडून देखील लस टोचून घेतल्यास हरकत नाही. पण बालकांच्या आरोग्यासाठी पालकांनी आपल्या पाल्यांना ही लस द्यावी, असे आवाहन अधिष्ठाता डॉ. सुनील घाटे यांनी केले. लसीकरणामुळे उलट्या, ताप, पुरळ येणे, चक्कर येण्याचे प्रकार घडल्यामुळे आतापर्यंंत ८८ बालके सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. सर्वांवर मोफत उपचार करण्यात आल्याचे यावेळी अधिष्ठाता डॉ. सुनील घाटे यांनी सांगितले.

पालकांच्या परवानगीशिवाय लस टोचू नका...च्लसीकरण करण्यापूर्वी बालकांची तपासणी करूनच त्यांना लस देण्याबाबत संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत. बालक आजारी असल्यास किंवा त्यांची इच्छा नसल्यास तसेच पालकांच्या परवानगी शिवाय बालकांना लस देऊ नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत. लस देण्यासाठी कोणतीही जबरदस्ती होणार नाही असेही यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार यांनी सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरHealthआरोग्य