शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रोहित पवारांची राज ठाकरेंवर खोचक टीका; सांगितली मनसेप्रमुखाची 'स्टाईल'

By appasaheb.patil | Updated: February 7, 2023 14:47 IST

रोहित पवारांनी विद्यार्थ्यांशी साधला संवाद; राजकीय नेत्यांच्या घेतल्या गाठीभेटी

सोलापूर : पुण्यातील कसबा मतदारसंघात उमेदवार देताना टिळक कुटुंबीयांवर अन्याय केला. या मतदारसंघात मनसेची ताकद असल्याचे मला समजले. राज ठाकरे या निवडणुकीत उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय त्यांनी भाजपच्या प्रभावाखाली घेतला. राज ठाकरे यांची स्वत:ची स्टाईल आहे. भाजपच्या प्रभावाखाली त्यांची स्टाईल हरवत आहे असा आरोप आ. रोहित पवार यांनी केला. 

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार हे सोलापूर शहरात आले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. याचवेळी भाजपने त्यांच्या ओबीसी नेत्यांची ताकद कमी केली, असा आराेपही पवार यांनी केला. उद्याेगपती गाैतम अदानींबाबत विचारलेल्या प्रश्नावर पवार म्हणाले, हिंडेनबर्गसारख्या कंपनीने स्वतःच्या फायद्यासाठी असे उद्योग सुरू केले आहेत. अदानीसारख्या कंपनीचे शेअर्स पडले की ते खरेदी करायचे आणि आपला फायदा करून घ्यायचा. पुन्हा जादा दराने विक्री करायची असे उद्याेग ही संस्था करते. देशात राेजगार देण्यात अदानी चाैथ्या क्रमांकावर आहेत. गुंतवणुकीवर परिणाम झाला तरी अदानींनी काेणत्याही कर्मचाऱ्याला कामावरून काढू नये असेही त्यांनी मत व्यक्त केले. 

सोलापूर येथील लोकसभेच्या जागेवर बाबतही त्यांनी विधान केले. ते म्हणाले की,  महाविकास आघाडीची लवकरच बैठक हाेणार आहे. महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षांना विश्वासात साेलापूर लाेकसभेची जागा काेणाला द्यायची याचा निर्णय हाेईल. हा निर्णय लवकर झाल्यामुळे कार्यकर्त्यांना काम करताना अडचण राहणार नसल्याचेही स्पष्ट केले.

टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसRaj Thackerayराज ठाकरेElectionनिवडणूक