शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

रोहिणी नक्षत्राची सोलापुरात बरसात; जिल्ह्यात ८२ मंडळांत पडला पाऊस

By रवींद्र देशमुख | Updated: June 6, 2024 18:23 IST

उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, मोहोळ व करमाळ्यात पावसाने चांगली हजेरी लावल्याचे दिसत आहे.

रविंद्र देशमुख, सोलापूर : रोहिणी नक्षत्राने जिल्ह्यात पावसाने चांगली सुरुवात झाली आहे. ९१ पैकी ८२ महसुली मंडळांत ५ मि.मी.पेक्षा अधिक पाऊस पडला आहे. उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, मोहोळ व करमाळ्यात पावसाने चांगली हजेरी लावल्याचे दिसत आहे.

यंदा जिल्ह्यात पावसाला लवकरच सुरुवात झाली आहे. रोहिणी नक्षत्राने यंदा सुरुवात चांगली झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. जिल्ह्यात मागील दोन दिवसांत तीन- चार मंडळ वगळता इतर मंडळांत पाऊस पडला. मात्र, चार- पाच मंडळांत ५ मि.मी.पेक्षा कमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील ९१ पैकी ९ मंडळांत ५ मि.मी.पेक्षा कमी, तर इतर मंडळांत त्यापेक्षा अधिक पाऊस पडला आहे.

जिल्ह्यातील उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, मोहोळ व करमाळा तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडला आहे. उत्तर तालुक्यातील पाच मंडळांत ६० मि.मी. म्हणजे जून महिन्याच्या सरासरी पावसाच्या ५२ टक्के इतका, दक्षिण तालुक्यात २६ मि.मी. म्हणजे २८ टक्के, अक्कलकोट तालुक्यात ३२ मि.मी. म्हणजे जून महिन्याच्या ३१ टक्के, मोहोळ तालुक्यात ५१ मि.मी. ५६ टक्के, तर करमाळ्यात ५३ मि.मी. म्हणजे ५३ टक्के पाऊस पडला आहे.मार्डी मंडळात सर्वाधिक पाऊस...

जिल्ह्यात मंगळवार व बुधवारी सलग दोन दिवस पाऊस पडला आहे. मार्डी मंडळात जिल्ह्यात सर्वाधिक ११६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. त्यानंतर सोलापूर मंडळात ७९ मि.मी., वडाळा मंडळात ४९ मि.मी., मुस्ती मंडळात ४४ मि.मी., तर मंद्रूप मंडळात ४२ मि.मी. पाऊस दोन दिवसांत पडला आहे. जून महिन्यात जिल्ह्यात सरासरी १०२.५ मि.मी. पाऊस पडणे अपेक्षित आहे. आतापर्यंत ३०.७ मि.मी. पाऊस पडला असून जवळपास ३० टक्के इतका पाऊस ५ जूनपर्यंत पडला आहे. मृग नक्षत्र शनिवार दिनांक ८ जून रोजी निघणार असून वाहन कोल्हा आहे. शुक्रवारच्या उत्तर रात्री म्हणजे शनिवारी मृग नक्षत्राला सुरुवात होणार आहे.

टॅग्स :Rainपाऊस